इतर

ग्रामीण भागातील पारंपरिक लोककला व संस्कृती चे जतन व्हावे – सौ सुलोचना जाधव

‘ओम बाल भैरवनाथ जागरण गोंधळ पार्टी’चा शुभारंभ

, दि. १२ ता. अकोले, जि. अहिल्यानगर :

अकोले तालुक्यातील कोकणवाडी येथे ‘ओम बाल भैरवनाथ जागरण गोंधळ पार्टी’ या कलापथकाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या उद्घाटन सोहळ्यामुळे परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.


या जागरण गोंधळ पार्टीमध्ये मुरळी निर्मळा घोडे यांच्यासह राम किसन घोडे, श्री उत्तम गोडे, श्री विष्णू पांडू जाधव, श्री शांताराम जाधव, श्री सिताराम जाधव, श्री मारुती अशोक जाधव, श्री पंढरी जाधव, श्री संपत बेंडकोळी, श्री गोरख निवृत्ती जाधव, श्री सुदाम सखाराम जाधव, श्री दशरथ वाळू जाधव श्री अंकूश लोहरे, सोमनाथ जाधव, श्री भाऊसाहेब जाधव,श्री किसन लखा जाधव हे कलाकार सहभागी झाले

कामगार कमिटीचे श्री एस. के. जाधव याच्या हस्ते श्रीफळ फोडून कार्यक्रमास सुरुवात झाली. तरी या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंच सौ. सुलोचना जाधव, श्री अशोक वाळू जाधव, श्री निवृत्ती दगडू जाधव, श्री एकनाथ वाळू जाधव, श्री एकनाथ चौरे, श्री बाळू महादू जाधव महादर्पणचे प्रतिनिधी श्री संतु जाधव यांच्यासह गावातील महिला, ग्रामस्थ आणि तरुण मित्र मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ग्रामीण भागातील पारंपरिक लोककला, धार्मिक संस्कृती आणि जागरण-गोंधळाच्या परंपरेचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने या कलापथकाचा शुभारंभ महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सरपंच सौ सुलोचना जाधव यांनी सांगितले
या नवीन उपक्रमाला गावकऱ्यांनी शुभेच्छा दिल्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button