आमदार लंके यांची भाविकां सोबत पायी पंढरपूर वारी !

पारनेर नगरपंचायतच्या माध्यमातून भाविकांना फराळ व फळे वाटप !
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
गेले दोन वर्षापासून कोविड या जैविक महामारीमुळे पंढरपूरची पायी दिंडी सोहळा बंद होता . परंतु यावर्षी पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातून अनेक दिंड्या आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर कडे रवाना झाल्या आहेत .
सालाबादप्रमाणे आमदार निलेश लंके यांनी दोन दिवस या पायी दिंडी सोहळ्यात सहभाग नोंदवायचे ठरविले व बुधवारी आमदार निलेश लंके यांच्यासह पारनेर नगर पंचायतचे नगराध्यक्ष विजय औटी व सर्व नगरसेवक नगरसेविका यांच्या सह किमान शंभर भाविक भक्त पंढरपूर कडे रवाना झाले .
गेल्याच आठवड्यात या वृद्ध मायबाप जनतेला या आषाढी वारीमध्ये आरोग्याची समस्या निर्माण होऊ नये म्हणून आरोग्य रथ व दहा डॉक्टरांची स्वतंत्र टीम गेले आठ-दहा दिवसापासून सदर दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाली आहे .
पारनेर नगरपंचायत च्या संयुक्त विद्यमाने मतदार संघासह मतदार संघा बाहेरीलही अनेक दिंड्यांना पौष्टिक फराळाचे व फळाचे 7000 भाविक भक्तांना वाटप करण्यात आले .
धार्मिक अस्मिता जतन करणारे आमदार निलेश लंके व पारनेर नगरपंचायत सर्व नगरसेवक नगरसेविका यांनी राबवलेल्या या धार्मिक व मंगलमय उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे ‘
यावेळी आमदार निलेश लंके विजुभाऊ औटी व सर्व नगरसेवकांनी पायी दिंडी सोहळ्यास आलेल्या सर्व वृद्ध माता पित्यांची व भाविक भक्तांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली व अडचणीत असणाऱ्या वारकरी बांधवांना आर्थिक मदतही केली .
यावेळी आमदार निलेश लंके यांच्या समवेत पारनेर नगरपंचायतचे नगराध्यक्ष विजुभाऊ औटी , उपनगराध्यक्ष सौ.सुरेखाताई भालेकर , आरोग्य समितीच्या सभापती सौ.विद्याताई कावरे , महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ.प्रियंका औटी , पाणीपुरवठा सभापती योगेश मते , नगरसेवक अशोक चेडे , सौ . नीता औटी , डॉक्टर बाळासाहेब कावरे , डॉक्टर सचिन औटी , विजय भास्करराव औटी , सुभाष शिंदे , हिमानी नगरे , नितीन अडसुळ , भूषण शेलार श्रीकांत चौरे यांच्या सह माहिती व तंत्रज्ञान खात्याचे प्रदेशाध्यक्ष जितेश सरडे , अॅड राहुल झावरे , सभापती सुदाम पवार , भाऊ निवडुंगे , बंडू साबळे,सतिष भालेकर , सुभाष कावरे , बंटी दाते , भाऊ साठे , सोनु नवले , भाऊ रासकर रायभान औटी यांच्या सह निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधीकारी हितचितक व शेकडो भाविक भक्त या पायी दिंडी सोहळयात सहभागी झाले होते .



