कोतुळ ग्रामपंचायतचे कर्मचारी पद्माकर महाजन सेवानिवृत्त!

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतुळ ग्रामपंचायतचे कर्मचारी पद्माकर रंगनाथ महाजन हे नुकतेच प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले
कोतुळ येथील प्रसिद्ध ज्योतिषी वामन रंगनाथ महाजन यांचे ते कनिष्ठ बंधू आहेत तत्कालीन सरपंच डॉक्टर किसनराव भुजबळ यांच्या काळात श्री पद्माकर महाजन यांनी 1986 मध्ये कोतुळ ग्रामपंचायत मध्ये लिपिक पदावर 75 रुपये महिना याप्रमाणे सेवा सुरू केली होती . सेवाकाळात त्यांनी ग्रामपंचायत कर वसुली चे चांगले काम केले 36 वर्षांची त्यांची यशस्वी सेवा नुकतीच पूर्ण झाली या निमित्ताने श्री पद्माकर महाजन यांचा कोतुळ ग्रामपंचायत मध्ये गट विकास अधिकारी श्री राहुल शेळके, विस्तार अधिकारी श्री के डी सरोदे श्री चौरे ,ग्रामविकास अधिकारी सुभाष जाधव ,सरपंच भास्कर लोहकरे ,उपसरपंच संजय देशमुख व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते सेवा निवृत्तीच्या दिवशीच श्री पद्माकर महाजन यांना त्यांच्या उपदान रकमेचा चेक प्रदान करण्यात आला



