आजचे पंचांग व राशी भविष्य दि.११/०३/२०२६,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन २० शके १९४७
दिनांक :- ११/०३/२०२६,
वार :- सौम्यवासरे(बुधवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:४२,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:३७,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- उत्तरायण
ऋतु :- सौर वंसतऋतु
मास :- फाल्गुन
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- अष्टमी समाप्ति २८:२०,
नक्षत्र :- ज्येष्ठा समाप्ति २२:००,
योग :- वज्र समाप्ति ०९:१२,
करण :- बालव समाप्ति १५:०९,
चंद्र राशि :- वृश्चिक,
रविराशि – नक्षत्र :- कुंभ – पू.भा.,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- मीन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- ज्येष्ठा वर्ज्य दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी १२:३९ ते ०२:०९ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०६:४२ ते ०८:११ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०८:११ ते ०९:४१ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ११:१० ते १२:३९ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०५:०७ ते ०६:३७ पर्यंत,
❀ दिन विशेष:
कालाष्टमी, यमघंट २२:०० नं.,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन २० शके १९४७
दिनांक = ११/०३/२०२६
वार = सौम्यवासरे(बुधवार)
मेष
वागण्या-बोलण्यात काहीसा हटवादीपणा येईल. कामात गतीमानता येईल. स्वत:बद्दलच्या नसत्या कल्पना बाजूला साराव्यात. बुद्धिचातुर्याने कामे कराल. परिस्थितीनुरूप वागणे ठेवाल.
वृषभ
वागण्यात कर्मठपणा आणाल. वडीलांचा मान ठेवून निर्णय घ्यावा. प्रगल्भतेने वागणे ठेवाल. न्यायी वृत्तीने मत मांडाल. नवीन विचार आत्मसात करावेत.
मिथुन
प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. आरोग्याची काळजी घ्यावी. अति विचार करू नका. अचानक धनलाभ संभवतो. मनातील आकांक्षा पूर्ण होईल.
कर्क
शांत व संयमी विचार कराल. वैचारिक आधुनिकता ठेवावी. जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. भावंडांना मदत कराल. घराची सजावट कराल.
सिंह
चुकीच्या लोकांमुळे मन:स्ताप होण्याची शक्यता आहे. परिस्थिती जाणून योग्य मार्ग काढावा. सर्दी, खोकला यांसारखे त्रास संभवतात. वाताचे विकार बळावू शकतात. गैरसमजुतीतून वाद वाढवू नका.
कन्या
मनातील नसते संशय काढून टाकावेत. अत्यंत व्यवहारी दृष्टीकोन ठेवाल. आपल्या बुद्धिमत्तेचा सदुपयोग करावा. दीर्घकाळ चिकाटीने कामे कराल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल.
तूळ
घरगुती कामात अधिक कष्ट पडू शकतात. आपल्या गृहसौख्याकडे अधिक लक्ष द्यावे. हातातील कामात यश येईल. नातेवाईकांना मदत करावी लागेल. प्रवासात वाहन जपून चालवावे.
वृश्चिक
काही गोष्टींचा अधिक खोलवर विचार करावा. धैर्याने कामे हाती घ्याल. व्यवसायात चांगली आर्थिक कमाई होईल. हातात काही नवीन अधिकार येतील. कौटुंबिक खर्चाचा ताण राहील.
धनू
काही बदल जाणीवपूर्वक करावेत. नसत्या वादात अडकू नका. निराशेच्या आहारी जाऊ नये. घराची कामे सुरळीत पार पडतील. स्वबळावर कामे उरकाल.
मकर
जुन्या गोष्टींचा आधार घेणे टाळावे. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. कामातील अडथळे प्रयत्नाने दूर करावे लागतील. छुप्या शत्रूंची डोकेदुखी वाढेल. हातातील अधिकार वापरावेत.
कुंभ
उगाचच कोणाशीही वैर पत्करू नका. काही कारणाने घरापासून दिवसभर दूर राहावे लागेल. गप्पांची मैफल जमवाल. तुमच्या बोलण्याचा चांगला प्रभाव पडेल. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा.
मीन
कामाचा योग्य आढावा घ्यावा. मानसिक ताण जाणवेल. कामातील दिरंगाई टाळण्याचा प्रयत्न करावा. मानापमान फार मनावर घेऊ नका. आपले स्वत्व गुण राखून वागाल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर


