कोतूळेश्वर मंदिर येथे महाशिवरात्र उत्सवाची सांगता,तीन लाख भाविकांनी घेतले दर्शन!

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतुळ येथील श्री क्षेत्र कोतूळेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्री निमित्ताने लाखो भाविकांनी कोतुळेश्वराचे दर्शन घेतले सुमारे दोन ते तीन लाख भाविकांनी यावेळी दर्शनासाठी हजेरी लावली
दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीला श्री क्षेत्र कोतुळेश्वर येथे महाशिवरात्री उत्सव आयोजित करण्यात येतो.
गेल्या आठ दिवसापासून या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते
काल महाशिवरात्रीच्या पर्वावर पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती देणगी व स्वागत कक्षा चे माध्यमातून येणाऱ्या भविकांचे दिवसभर स्वागत केले जातं होते कोतुळेश्वर देवस्थानचे अध्यक्ष व लिज्जत पापड चे कार्यकारी अधिकारी सुरेशराव कोते यांचे मार्गदर्शनाखाली देवस्थान कमिटीने उत्कृष्ट नियोजन केले
महाशिवरात्रीच्या पर्वावर दिवसभर भाविकांची मोठ्या प्रमाणावर रेलचेल दिसून आली महाशिवरात्र यात्रेत श्री वेंकटेश्वरा को-ऑपरेटिव्ह ऍग्रो अंड प्रोसेसिंग कंपनी लिमिटेड या सहकारी संस्थेच्या उत्पादनाचा स्टॉल संस्थेचे पदाधिकारी बाळासाहेब देशमुख यांनी लावला होता या स्टॉलला अनेक भाविकांनी भेट देत व्यंकटेश्वरा अगरबत्ती ला पसंती दिली
महाशिवरात्री यात्रेत विविध प्रकारचे खेळणे खाद्यपदार्थ यासारख्या स्टॉलचे मंदिर परिसरात ठीक ठिकाणी दुकाने थाटली होती
अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतुळ दूरक्षेत्रातील पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला
या दिवशी अर्पण ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला
महाशिवरात्र महोत्सवाचे निमित्ताने सप्ताह काळात ह. भ. प. दयानंद महाराज कोरेगावकर , ह. भ. प. दिनानाथ महाराज सावंत (मालेगाव), ह.भ.प. संजय महाराज वेळूकर (सातारा) ह.भ.प. विश्वनाथ महाराज वारिंगे (भिवंडी) ह.भ.प.प्रसाद महाराज भोर (, देहु) प. पु. श्री स्वामी १००८ हरि चैतन्य महाराज ह. भ. प. गोविंद महाराज गोरे (आळंदी) यांचे कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला तर आज सोमवारी सकाळी ह. भ. प. अमोल महाराज वाकळे यांचे काल्याच्या कीर्तनाने महाशिवरात्र महोत्साची सांगता झाली
———==



