धार्मिक
क्षितिजभैय्या नरेंद्र घुले पा. यांनी घेतले आखारभाग येथील मंदिरात माता चौंडेश्वरी देवीचे दर्शन

पाथर्डी प्रतिनिधी:-
शहरातील देवांग कोष्टी समाजाचे कुलदैवत श्री चौंडेश्वरी देवीच्या सालाबादप्रमाणे साजरा होणारा नवमी
उत्सव व पालखी सोहळा निमित्ताने आज शेवगाव पंचायत समितीचे मा.सभापती क्षितिजभैय्या नरेंद्र घुले पा. यांनी
आखारभाग येथील मंदिरात माता चौंडेश्वरी देवीचे दर्शन घेऊन देवस्थान समितीची सदिच्छा भेट घेतली
उत्सवानिमित्त सर्व कोष्टी बांधवांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री रामदास कांबळे, किशोर पारखे, चंद्रकांत सरोदे, नारायण भागवत, रवींद्र कांबळे,वीर सर, शुभम पारखे, सिताराम बापू बोरुडे, चांद मणियार, हर्षवर्धन ताठे, योगेश नरवडे, प्रसाद सबलस, उबेद आतार, तसेच शहरातील ग्रामस्थ पदाधिकारी आणि
कार्यकर्ते आदी उपस्थित होते.