इतर

कोकणवाडी,( ता. अकोले,) येथे आदिवासी समाजातील जाधव भावकी चा स्नेह मेळावा!

एस के जाधव

महादर्पण प्रतिनिधी 

सहयाद्री व कोळवणातील कोळी महादेव समाजातील  जाधव भावकी चा  भावकी स्नेह मेळावा उद्या रविवारी  १२ एप्रिल २०२६ रोजी  बाल भैरवनाथ मंदीरासमोर, कोकणवाडी,( ता. अकोले,) जि. अहिल्यानगर येथे आयोजित केला आहे 

डिजिटल युगात माणसं, समाज एकमेकांपासून दूर जात आहे भावकी, नातेसंबंध मोबाईल मुळे दूर जात असताना दुरावलेले नाते  एकत्र करण्याचे काम  जाधव भावकी,स्नेह मेळाव्यातून करण्याचा आगळावेगळा कार्यक्रम पार पडत आहे 

 जाधव भावकीचा सांस्कृतिक वारसा जपत, आदिवासी परंपरेचा सन्मान करणारा आणि भावकीतील ऐक्य वृध्दिंगत करणारा हा स्नेहमेळावा विशेष आयोजन आहे. भावकी ही एका कुटुंबातील किंवा रक्ताच्या नातेसंबधातील लोकांचा समुह आहे, जे एकमेकांना आधार देतात आणि मदतीसाठी एकत्र येतात रक्तसंबंध आणि कुळ, सामाजिक आधार, एकत्रित कार्य, पारंपारिक व्यवस्था सण व उत्सव, विवाह सोहळे व कौटुंबिक कार्यक्रमामध्ये भावकीतील सदस्य एकत्र येतात. आर्थिक सामाजिक आणि भावनिक आधार देतात.

आज शनिवार, दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी सायं. ६:००वा. मोठयादेवाचे पुजन करून , धरतीवंदना, करत  मेळाव्याची सुरवात झाली मान्यवरांचे स्वागत करून  रात्री  ८:०० वा. स्नेहभोजन, रात्री १०:०० वा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडत आहे

उद्या रविवार दिनांक १२ एप्रिल २०२६ सकाळी १०:०० वा. संस्कृती आधारावर व्याख्याने, आदिवासी जिवनशैली व परंपरा आदिवासी लोककला, नृत्य व गीतांचा इतिहास नव्या पिढीने एकन्न ठेवुन संस्कृती कशी जपावी यावर आधारित व्याख्याने तरुणाचे शैक्षणिक व व्यवसायिक समस्या सकाळी ११:०० वा. महिला सहभाग सन्मान  संस्कृतीवर अनुभव कथन सामाजिक व भावकी कार्यात विशेष योगदान देणा-यांचा सन्मान केला जाणार आहे 

दुपारी १:०० वा. सामुहिक भोजन  दुपारी ३:०० वा पुढील एकत्रित योजना व सुचना कार्यक्रमाची सांगता व आभार प्रदर्शन होणार आहे 

या कार्यक्रमास  आदिवासी समाजातील महादेव कोळी समाज बांधवा तील सर्व जाधव भावकी मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे 

अकोले तालुक्यातील अपडेट्स साठी हा ग्रूप जॉईन करा

👇👇

https://chat.whatsapp.com/EiToYhTkE3u7zOoyJ1nEJ6?mode=gi_t

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button