अकोलेचा सुपुत्र श्रेयस मंडलिक M.P.S.C परीक्षेत राज्यात दुसरा!

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील माळीझाप (नवलेवाडी) येथील श्रेयस दिलीप मंडलिक याने कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय स्वअभ्यासाच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) सहायक नगररचनाकार श्रेणी-१ परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
२०२२ च्या परीक्षेत अवघ्या दोन गुणांनी संधी हुकल्यानंतरही खचून न जाता त्याने २०२४ मध्ये हे दैदीप्यमान यश मिळवले.
जिल्हा परिषद शाळा नवलेवाडी (अकोले ) येथे चौथी पर्यत चे प्राथमिक शिक्षण झाले अकोल्ल्यात अगस्ति विद्यालयातून दहावी पर्यंत चे शिक्षण घेतले तर बारावी सायन्स पर्यंतचे शिक्षण त्याने संगमनेर येथील डी ए ओहरा ज्युनियर कॉलेज मधून घेतले त्यानंतर त्याने सिहगड इंजिनिअरींग कॉलेज पुणे येथून सिव्हिल इंजिनिअरिंग ची पदवी पूर्ण केली

श्रेयसच्या या यशाबद्दल अकोले नगरपंचायत परिसरात वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर आज त्याचा महात्मा फुले समता परिषद अकोले, व अकोले तालुका ओबीसी संघटनेने त्याचे कौतुक करत सत्कार केला
ग्रामीण भागातील श्रेयस मंडलिक याने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मिळविलेल्या या दैदीप्यमान यशाचे अकोले तालुक्यात कौतुक करत त्याच्या वर अभिनंदनाचा चा वर्षाव केला जात आहे
एम.पी.एस.सी परीक्षा पास होण्यासाठी अनेक लोक लाखो रुपये कोचिंग क्लासेस वर खर्च करूनही पाहिजे तेवढे यश मिळत नाही परंतु श्रेयस ने कोणताही कोचिंग क्लास न लावता मिळवलेले स्वबळावरचे यश आमच्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याची भावना त्याची आई सौ.सविता मंडलिक, वडील श्री.दिलीप मंडलिक यांनी व्यकत केली
=========


