इतर
डॉ.व्ही. व्ही.पोपेरे यांना भारत विभूषण सन्मान 2026 जाहीर

अकोले प्रतिनिधी
शहरी व ग्रामीण आदिवासी भागामध्ये स्वर्गीय रुक्मिणीबाई पोपेरे चॅरिटेबल ट्रस्ट बदलापूर ठाणे यांच्या माध्यमाने समाजसेवेचे कार्य करणाऱ्या आदिवासी सेवक डॉ.व्ही. व्ही.पोपेरे यांना पंजाब सरकार च्या वतीने भारत विभूषण सन्मान 2026 हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर झाला आहे
डॉ.व्ही. व्ही.पोपेरे यांचे कार्य केवळ महाराष्ट्र राज्यापुरते मर्यादित नसून संपूर्ण भारत देश व देशा बाहेर देखील विखुरलेले आहे. डॉ.पोपेरे यांच्या उल्लेखनीय समाज कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून नुकताच त्यांना पंजाब सरकार यांच्या वतीने भारत विभूषण सन्मान 2026 राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर झाला असून पंजाब राज्य विधानसभा अध्यक्ष पंजाब सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चंदीगड पंजाब येथे दिला जाणार आहे



