इतर

साहित्यिक संजय कळमकर यांचे भायगाव येथे व्याख्यानाचे आयोजन


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी

शेवगाव -नेवासा राजमार्गावरील भायगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने ‘जागर माणसाचा’ या विषयावर प्रसिद्ध साहित्यिक हास्य सम्राट डॉ. संजय कळमकर यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संयोजकाच्या वतीने देण्यात आली आहे.

दीपावलीच्या या आनंद उत्सवाच्या सणानिमित्त रोजच्याच धकाधकीच्या जीवनातील ग्रामीण भागातील नागरिकांना हास्याचा एक मनमुराद आनंद लुटता यावा या हेतूने २४ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता नवनाथ बाबा मंदिराच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.याच वेळी राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांचाही सन्मान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कल्याण आढाव तर प्रमुख पाहुणे म्हणून शब्दगंध साहित्य परिषदेचे संस्थापक सुनील गोसावी,शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब भोसले व भायगावचे सरपंच राजेंद्र आढाव उपस्थित राहणार आहेत. तर भगवान आढाव, शेषराव दुकळे, अँड. लक्ष्मणराव लांडे, सोपान लांडे, एकनाथ लांडे, गणपत आढाव,डॉ.विजय खेडकर, अण्णासाहेब दुकळे, बबनराव सौदागर, संतोष आढाव यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी भायगावसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शहाराम आगळे व राजेंद्र केशव आढाव यांच्यासह संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button