इतर

एकदरे ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडीचे टाळ मृदुंगांच्या गजरात प्रस्थान.

अकोले /प्रतिनिधी 

    अकोले तालुक्यातील संत निवृत्तीनाथ वारकरी संप्रदाय सेवा ट्रस्ट संचलीत,एकदरे,पिंपळदरावाडी,चंदगीरवाडी, जायनावाडी,बिताका ते श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळा सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी एकदरे ओम श्री.मोखाजी बाबा मंदीर व ओम श्री मारुती मंदिर येथुन दिंडीचे प्रस्थान झाले.

ह.भ.प.पांडुरंग महाराज भांगरे,ह.भ.प.इदे महाराज,ह.भ.प.काळु महाराज भांगरे,ह.भ.प.किसन महाराज पेढेकर, निवृत्ती महाराज भांगरे,यांच्या मार्गदर्शनाखाली हा पायी दिंडी सोहळा आयोजित केला जातो.ह.भ.प.पांडुरंग महाराज भांगरे यांनी तुळसीवृंदावन,विना,टाळ,मृदुंग,यांचे पुजन करून टाळ मृदुंगांच्या गजरात भजन करीत संत निवृत्तीनाथ पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान झाले.

त्यानंतर पहिला मुक्काम जायनावाडी येथे समस्थ ग्रामस्थांनी संध्याकाळी दिंडीचे स्वागत केले.गावातील सर्व महिलांनी व बालगोपाळांनी सहभाग घेऊन दिंडीचे भक्तीमय वातावरणात स्वागत केले.दुसऱ्या दिवशी सकाळी दिंडीचे त्र्यंबकेश्वर च्या दिशेने प्रस्थान झाले.

यावेळी ह.भ.प.संपत महाराज भांगरे,ह.भ.प.यशवंत महाराज बेंडकोळी, साहेबराव भांगरे,विठ्ठल भांगरे,ह.भ.प.इदे महाराज,मृदुंगाचार्य ह.भ.प.निवृत्ती महाराज,ह.भ.प.गोरख महाराज भांगरे,यशवंता भांगरे,भदु बाबा भांगरे,नानासाहेब भांगरे,ह.भ.प.विलास महाराज भांगरे,तुळशी वृंदावन महिला,चोपदार तसेच एकदरे परिसरातील सर्व भजनी मंडळ व महिला मंडळ तसेच तरुण मित्र मंडळ यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button