इतर

अबीतखिंड गावाला पर्यावरण मित्र पुरस्कार प्रदान

अकोले प्रतिनिधी

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ या संस्थेचे आठवे पर्यावरण संमेलन आळंदी येथे संपन्न झाले या सम्मेलनात अकोले तालुक्यातील अबीतखिंड गावाला राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्कार देण्यात आला

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ या संस्थेचे वतीने घेण्यात आलेले आठवे एक दिवसीय पर्यावरण संमेलन नुकतेच आळंदी येथील देविदास आश्रमशाळा तथा मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर येथे पार पडले
या ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ प्रा. श्रीधर महाजन हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. तर उद्घाटक म्हणून आळंदी देवस्थानचे विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने संमेलनाचे उद्घाटन संपन्न झाले.

याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रमोद मोघे, पुणे मनपाचे माजी सहाय्यक आरोग्य अधिकारी प्रभाकर तावरे, देविदास आश्रम शाळेचे प्रमुख ह. भ. प. निरंजनशास्त्री कोठेकर, मंडळाचे अध्यक्ष प्रमोददादा मोरे, इंद्रायणी बचाव समितीचे विठ्ठल शिंदे, ॲड. लक्ष्मण येळे, छायाताई राजपूत, विलास महाडिक, मनिषाताई पाटील, लतिकाताई पवार, प्रभाकर म्हस्के,आदी उपस्थित होते.

संमेलनाचे प्रास्ताविक व स्वागत धीरज वाटेकर यांनी केले. यावेळी ग्रंथ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

आळंदी येथे ८ वे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन संपन्न पार पडले.या संमेलनामध्ये पर्यावरण विषयी राज्यात ज्या ज्या गावांनी चांगले काम केले आहे.त्या गावांना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये अकोले तालुक्यातील आबिटखिड गावाला “वृक्षमित्र स्व.आबासाहेब मोरे राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्कार” २०२३ मिळाला त्याचे वितरण डॉ. प्रमोद मोघे तसेच मंडळाचे अध्यक्ष प्रमोददादा मोरे छायाताई रजपूत ,व नश्रीताई यांच्या शुभहस्ते करण्यात आले
अबीतखिंड गावाला शाल,ट्रॉफी देऊन निसर्ग व पर्यावरण हा सन्मान बहाल करण्यात आला.

गावच्या विकासासाठी पर्यावरणाचा ध्यास घेऊन काम करणारे श्री.रामनाथ भोजने,श्री.सुधाकर गोडे,श्री मुरलीधर गोडे श्री.चंद्रकांत भोजने,श्री.एकनाथ गोडे,श्री सिताराम गोडे,संगीता भोजने श्री.भरत गोडे,श्री.सिताराम भोजने यांनी हा पुरस्कार स्वीकारला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button