इतर
रुंभोडी येथील सुंदराबाई बबन सावंत यांचे निधन

रुंभोडी प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील रुंभोडी येथील शेतकरी कुटुंबातील ज्येष्ठ आदर्श माता स्वर्गीय सुंदराबाई बबन सावंत वय 78 यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले
त्या अतिशय मनमिळाऊ व धार्मिक वृत्तीच्या होत्या त्यांनी आपल्या सर्व मुलांवर चांगले संस्कार केले त्यांच्या पार्थिव देहावर प्रवरातीरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी ग्रामस्थ,राजकीय,सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते
त्यांच्या पश्चात पती दोन मुले दोन मुली जावई सुना नातवंडे असा परिवार आहे सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब सावंत व उद्योजक प्रकाश सावंत यांच्या मातोश्री होत्या तर इंदोरी येथील विठ्ठल मंदिर ट्रस्टचे विश्वस्त शांताराम बापू नवले यांच्या सासू होत्या त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली


