इतर

लव जिहाद च्या संशया तुन लिंग पिसाट तरुणाला मारहाण गावात दोन समाजात तणाव कडकडीत बंद

अकोले तालुक्यातील कोतुळ येथे लव जिहादच्या
संशयाहून एका तरुणास बेदम मारहाण करण्यात आली.इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर तिला घरी बोलावून घेतले, माझे तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्याशी लग्न करणार आहे असे म्हणत एका तरुणीस घरात बोलावून घेत त्याने तिच्यावर अत्याचार केला. तर तिच्याकडून नग्न अवस्थेतील फोटो घेऊन तिला वारंवार धमकाविण्यात आले. दरम्यान, तेथील काही तरुणांना अरोपीच्या घरात काहीतरी संशयास्पद हालचाली दिसल्या. तेव्हा त्यांनी थेट घरात प्रवेश केला आणि या तरुणाचे बिंग फुटले. त्यानंतर तेथील काही तरुणांनी यास बेदम मारहाण केली.
दरम्यान, हा प्रकार पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांना
समजल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
स्थानिक नागरिकांना समजून सांगत सलोख्याने प्रश्न
हताळला. प्रचंड तणावाचे वातावरण असून देखील तेथे
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिला नाही.
नंतर पीडित मुलीच्या फिर्यादीनुसार आरोपी अतिक
सादीक मनियार (रा/ कोतुळ, ता. अकोले) याच्यावर
अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,
एक वर्षापुर्वी अतिक मनियार याच्यासोबत
पीडितेची इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर
ओळख झाली होती. तेव्हापासून ते दोघे
मैत्री म्हणून इन्स्टाग्रामवर चॅटिंग करत होते.
तर त्यानंतर व्हाटसअपच्या माध्यमातून
देखील त्यांच्यात चर्चा होत होती. त्यानंतर
अतिक पीडित मुलीस म्हणाला की, तु मला
फार आवडतेस, मी तुझ्याशी लग्न करणार
आहे. मात्र, मुलीने त्यास नकार दिला होता.
परंतु हा तिच्याशी कायम मेसेज करुन प्रेम
व्यक्त करत होता.

१५ दिवसांपुर्वी अतिक याने पीडितेला मेसेज करुन तिचे काही फोटो मागवून घेतले होते. मला तुला पहायचे आहे असे म्हणत त्याने अग्रह केला आणि पीडितेने त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला फोटो देखील
टाकले. त्यानंतर या दोघांमधील प्रेम अधिक वाढले
आरोपी अतिक याने पीडितेकडे तिचे नग्न फोटो
मागविले. विशेष म्हणजे अतिक हा लग्न करणार म्हणून
पीडित मुलीने त्यास फोटो देखील टाकले. आता
आरोपीकडे फोटो आल्यामुळे, त्याची पीडितेवर मनमानी चालत होती. जेव्हा पाहिजे तेव्हा फोन आणि मेसेज होत होते. जर, मुलीने विरोध केल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी मिळत होती. त्यामुळे तिचे देखील मजबुरीने हात बांधले होते.गेल्या अनेक दिवसापासून हा प्रकार सुरू होता

दि. ०५ जून २०२३ रोजी अतिक याने पीडितेस सकाळी १०:३० वाजता फोन केला आणि सांगितले की, माझ्या घरी दुपारी कोणी नाही. मी एकटाच
आहे तेव्हा तू १२:३० वाजता ये, आपण गप्पा मारु. तेव्हा पीडित मुलीने नकार दिला. मात्र, त्याने तिला फोटोंची आठवण करुन दिली. त्यानंतर मुलगी भेटण्यास तयार देखील झाली. ठरल्याप्रमाणे मुलगी घरात गेली आणि याने घरातून दार लावून घेतले.

अतिक याचे घर चौकात असल्यामुळे हा प्रकार तेथील काही तरुणांनी पाहिला होता. मात्र, मैत्री म्हणून एकमेकांच्या घरी जाऊ शकतात अशी धारणा मुलांनी केली. मात्र, बराच वेळ झाला तरी घरात गेलेली मुलगी
बाहेर आली नाही. त्यामुळे, तेथे उपस्थित
असणाऱ्या तरूणांना शंका आली.

घरात अतिक पीडित मुलीस म्हणत होता. की, माझे
तुझ्यावर प्रेम आहे. त्यामुळे, मला तुझ्याशी संबंध ठेवायचे आहे. मात्र, तरुणी त्यास म्हणत होती की, तुला जे काही करायचे आहे. ते लग्न झाल्यानंतर कर. मात्र, अतिकने काही एक एकले नाही. त्याने तरुणीच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला.

पीडित तरूणी हिच्याशी काहीतरी गैरकृत्य होत असल्याचा संशय काही तरुणांना आला तेव्हा या प्रकारावर प्रकाश पडला. त्यानंतर अतिक
यास तेथील काही तरुणांनी चांगलाच चोप दिला. यावेळी तरुणांनी प्रचंड घोषणाबाजी केली. हजारोंचा जमाव कोतुळमध्ये जमला होता. मात्र, पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांनी अगदी चोख पणे कोठे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिला नाही. सायंकाळी पीडितेने।दिलेल्या फिर्यादीनुसार अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अतिक हा पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button