इतर

३१ ऑगस्ट हा दिवस “भटके विमुक्त दिवस” म्हणून साजरा करण्यास शासनाची मान्यता – रविकांत राठोड


३१ ऑगस्ट रोजी “भटके विमुक्त दिवस” साजरा करण्यासाठी रु. १० लाख रुपयांची शासकीय तरतूद


अकोले प्रतिनिधी
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित दादा पवार यांनी भटक्या विमुक्त समाजाची मागणी लक्षात घेता घेऊन राज्य शासनाने 31 ऑगस्ट दिवस भटक्या विमुक्त दिवस म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली आहे

भटका विमुक्त समाज महाराष्ट्र राज्याच्या व देशाच्या प्रगतीमध्ये आपले योगदान देत आहे. भटक्या विमुक्त समाजाचे स्वातंत्र्यातील व राष्ट्र उभारणीतील योगदान लक्षात घेऊन त्यांच्या सन्मानात ३१ ऑगस्ट हा दिवस “भटके विमुक्त दिवस” म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने साजरा करण्याची विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटक्या विमुक्त विभागाचे राज्यप्रमुख रविकांत राठोड, प्रदेश सरचिटणीस सौ.टीशाताई माडेवार यांनी शासनाकडे केली होती.

सन १८७१ मध्ये तत्कालीन ब्रिटिश सरकारने क्रिमिनल ट्राइब्स ऍक्ट अंतर्गत काही जातींना गुन्हेगार जाती म्हणून घोषित केले होते. या ब्रिटिश कायद्यामुळे भटक्या विमुक्त जाती जमाती मधे मोडत असलेल्या समाज बांधवांना स्वातंत्र्यपूर्व काळात अमानुष अन्याय , अत्याचार सहन करावा लागत होता.


स्वातंत्र्यानंतर हा समाज खास करून मुख्य प्रवाहापासून दूर राहिल्याने भटक्या विमुक्त समाजाला न्यायासाठी विलंब झाला पर्यायाने त्याचे दीर्घकालीन सामाजिक परिणाम या समाजावर झाले स्वातंत्र्यानंतर ३१ ऑगस्ट १९५२ रोजी क्रिमिनल ट्राइब्स ऍक्ट हा कायदा रद्द करण्यात आला आणि या जातींना या कायद्यातून मुक्त करण्यात आले म्हणजेच मुक्त झालेल्या जाती जमाती म्हणून घोषित करण्यात आले.

भटक्या विमुक्त समाजाचे महाराष्ट्र राज्य व राष्ट्र उभारणीमध्ये योगदान लक्षात घेऊन त्यांच्या सन्मानार्थ ३१ ऑगस्ट हा दिवस “भटके विमुक्त दिवस” म्हणून साजरा करण्यास आज दि. ३१ जुलै २०२५ रोजी शासनाने शासन निर्णय क्रमांक – संकीर्ण-२०२५/प्र. क्र.९८/मावक या निर्णयाद्वारे शासन मान्यता देऊन हा दिवस साजरा करण्यासाठी रुपये १० लाख रुपयांची तरतूद देखील करून दिली आहे.
शासना च्या या निर्णयाचे समस्त भटक्या विमुक्त समाजाच्या वतीने महायुती सरकारचे अभिनंदन करण्यात येत असून महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, इतर मागास व बहुजन कल्याण विकास मंत्री अतुल सावे यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
या शासन निर्णयाद्वारे पहिल्यांदाच संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये सुट्टी असताना देखील ३१ ऑगस्ट हा दिवस भटके विमुक्त दिवस” म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भटक्या विमुक्त विभागाचे राज्यप्रमुख रविकांत राठोड, सरसिटणीस सौ.टीशाताई माडेवार,राज्य उपाध्यक्ष, अंबादास धनगर, सुरेश धोत्रे, गणेश धायडे,सचिन जोरे, अकोले तालुका अध्यक्ष संजय फुलसुंदर यांनी केले आहे.

महायुती सरकारने भटक्या विमुक्त समाजासाठी घेतलेला हा निर्णय समाज विकासाची वाटचाल प्रगती कडे नेणारा आहे या निर्णयाचे समस्त भटक्या विमुक्त जमातीत स्वागत केले जात आहे महायुती सरकार या समाजाच्या पाठीशी आहे पक्षाचे अध्यक्ष अजितदादां नी समाजाला विकास प्रवाहात आणण्या साठी दूरदृष्टीने हा निर्णय घेतल्याचे अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी म्हटले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button