अकोल्यात दुय्यम निबंधक कार्यालयात महसूल सप्ताहाचा शुभारंभ

अकोले (प्रतिनिधी)
अकोले दुय्यम निबंधक कार्यालयात “महसूल सप्ताह” चा शुभारंभ सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करून झाला. त्याचबरोबर कार्यालय परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले.
सेवा निवृत्त सहायक जिल्हा मुद्रांक अधिकारी अनिल नढे, कर्मचारी भांगरे मामा यांचेसह जेष्ठ दस्त लेखनिक अनिल जोशी यांचा सह दुय्यम निबंधक अतुल कदम यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला. याप्रसंगी अनिल नढे यांनी 34 वर्षाच्या शासकीय सेवेतील अनुभव सांगून काम करताना कोणती काळजी घ्यावी? याची माहिती दिली. तसेच दस्त लेखनिकांना देखील मार्गदर्शन केले.
आरंभी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक दुय्यम निबंधक अतुल कदम यांनी प्रास्तविकात महसूल सप्ताह विषयी माहिती दिली. दस्त लेखनिक अजय जाजू, सुदाम वाकचौरे, रमेश गायकवाड यांनी आपल्या मनोगतात अनिल नढे, अतुल कदम बरोबरच आदी अधिकाऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्य व मार्गदर्शनाबाबत कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी ऍड. ज्ञानेश्वर पवार, ज्ञानेश्वर काळे, सचिन अरगडे, चंद्रकांत देशमुख, शेखर वाघमारे, प्रशांत शेणकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर वेताळ, दिपाली धात्रक, सुनील गुरव यांनी विशेष परिश्रम घेतले. तर नितीन बिघोत यांनी उपस्थितांचे आभार मानले.


