इतर

सिद्धार्थ वसतिगृहातील विद्यार्थ्यांना राखी बांधून जपली सामाजिक बांधिलकी!

सेनापती बापट विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

दत्ता ठुबे /पारनेर दि.८ पारनेर प्रतिनिधी
पारनेर शहरातील अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे सेनापती बापट विद्यालयात सिद्धार्थ वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सेनापती बापट विद्यालय मधील विद्यार्थिनींनी रक्षाबंधन निमित्ताने राखी बांधून एक सामाजिक बांधिलकी साधली आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर होते तर प्रमुख उपस्थिती पाणी पुरवठा सभापती योगेश मते, मुख्याध्यापक रावसाहेब कासार (सर),श्री छत्रपती प्रतिष्ठान अध्यक्ष शशिकांत गाडेकर(सर), निवासी मतिमंद मुलांची शाळा व्यवस्थापकीय अधीक्षक प्रशांत साळवे (सर)उद्योजक राजू शेख, शाळा समिती अध्यक्ष अनिल भंडारी, शाळा समिती सदस्य अमित जाधव, अरुण बढे,विलास कटारिया , ब्रह्मकुमारी विश्व विद्यालयाच्या साधना दिदी, मगर दिदी आदी मान्यवर उपस्थित होते.


निवासी मतिमंद मुलांची कृषी कार्यशाळा ,शिक्रापूर येथील शालेय विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व्हावी व या वंचित घटकाना सर्व सामन्याच्या प्रवाहात आणण्यासाठी या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या राख्या खरेदी करण्यात आल्या आणि या राख्या सेनापती बापट विद्यालय मधील सिद्धार्थ वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यालयातील विद्यार्थिनी कडून बांधण्यात आल्या. सिद्धार्थ वसतिगृहातील विद्यार्थी जिल्ह्यातील विविध गावातील आहेत त्यांना आपापल्या गावी जाऊन बहिणीकडून राखी बांधणे शक्य नसल्याने सेनापती बापट विद्यालय यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून या बहीण भावाचे अतूट नात्याचे रक्षाबंधन केले. विद्यालयाच्या या सामाजिक उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांकडून कौतुक होत आहे. वंचित घटकां साठी असे सामाजिक उपक्रम राबविण्यात यावी अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली.

सूत्रसंचालन संतोष नरसाळे यांनी केले तर आभार सुनील गायकवाड सर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button