इतर

संदीप वाकचौरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन..

वाचनासाठीचे वातावरण निर्माण करण्याची गरज.. – अभिराम भडकमकर 

संगमनेर प्रतिनिधी 

वाचन संस्कृती नाही, तर वाचनाचे वातावरण कमी झाले आहे. लेखक लिहीत आहेत, वाचक वाचत आहेत मात्र आता वाचनाचे वातावरण निर्माण करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.भाषा हा शिक्षण तज्ज्ञांचा विषय आहे. आज दुर्दैवाने तो राजकीय झाला असल्याची खंत ज्येष्ठ नाट्य लेखक, अभिनेते अभिराम भडकमकर यांनी व्यक्त केली

. ते चपराक प्रकाशनाचे वतीने संदीप वाकचौरे यांनी लिहिलेल्या भाषा व शिक्षण, शिक्षणरंग या पुस्तक प्रकाशन समारंभात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामवंत निर्माते व अभिनेते अरुण नलावडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर ऊर्जा उद्योग समूहाचे राम कुतवळ होते.

भडकमकर आपल्या भाषणात म्हणाले की, लोकनेतात वाचतात आज वातावरणाची गरज आहे माध्यमांमध्ये परीक्षा न घेणे थांबले आहेत चर्चा वादविवाद पुस्तकाविषयी फारसे घडत नाहीत नियतकालिकेत सर्वात महत्त्वाचे माध्यम होते तेही आता संपुष्टात आले आहेत वाचक व लेखक यांच्यातील संवाद हरवला आहेत समाज माध्यमावर पुस्तकावर चर्चा होते वर्तमानात पुस्तकावरील गरज अदुखी झाली आहे दुर्दैवाने दूरदर्शन सारख्या विविध वाहिन्यांवरती आठवड्याचे दोन तास सुद्धा पुस्तकांवर चर्चा होतात दिसत नाहीत मात्र त्याच वेळेस एखाद्या अभिनेत्रीने चिरोटे कसे करावे हे दाखवले जाते यातून जनमानसावर परिणाम घडत आहेत आपण एक वेळेस हॉटेलमध्ये खातो मात्र पुस्तकाची किंमत थोडी वाढली तर आपण पुस्तक भाग जाईल असे म्हणतो पुस्तक माणसाच्या आयुष्याच्या संध्याकाळपर्यंत मदत करत असतात हे लक्षात घ्यायला हवे वाचणारे लिहिणारे जोपर्यंत अस्तित्वात आहेत तोपर्यंत भाषा वाचेल आंदोलनामुळे भाषा वाचणार नाहीत दुर्दैवाने अलीकडच्या कालखंडामध्ये समीक्षकांची ठराविक फुटपट्टीत त्या आधारे पुस्तकांचे मूळ ठरवण्यात येत आहेत यामुळे विविध अंगी लेखन थांबले आहेत आमची नाटके सुद्धा एक सुरी स्वरूपात पुढे येत आहेत विविधता ही अधिक महत्त्वाची आहेत. 

महापुरुषांची पुतळे उभे राहू लागली की, समजावं त्या माणसाचा अंत सुरू झाला आहे. शिवरायांची युद्धनीतीची वर्तमानात अधिक गरज आहेत. माणसाने टोकदार लिहावेत, मात्र टिंगल ,टवाळी करू नये. टीका करावी ,पण आज समाजमाध्यमामध्ये टिंगल आणि अवमान करण्याकडेच जास्त कल दिसतो आहे. सत्य बोलणारे माणसाला मित्र नसतात ते अगदीच खरे आहे. आपल्याला समाजामध्ये उत्तम वातावरण निर्माण करायचे असेल, तर पुस्तकांचा बोलबाला व्हायला हवा. पुस्तक माणसं जोडतात.राष्ट्र आणि समाज जोडत असते. त्यावेळी पुस्तक अधिक महत्वाची भूमिका बजावतात असे मत व्यक्त केले. 

अध्यक्षपदावर बोलताना अरुण नलावडे म्हणाले की, समाजासाठी कोणी लिहीत असेल तर आपणच त्याचा पाया बनायची आवश्यकता आहे. वाचलेलं आणि ऐकलेलं जो आचारात आणतो तो खरा नागरिक. सध्याच्या परिस्थितीमध्ये साक्षर माणूस उभा करण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागता आहेत. पुस्तकच समाज व देशाला जगवणार आहेत. लेखन संस्कृती वाढविण्याची जबाबदारी लेखकांवरती आहेत. अजून आपल्याला पुरेसं भान आलेले नाहीत याची खंत आहे. जगात शरीर संपते पण विचार कधी संपत नाहीत. विचार करणाऱ्या प्रकाशन संस्था जगल्या पाहिजेत, आपल्यानंतर येणाऱ्या पिढीला जपणे अधिक महत्त्वाचे आहे. पुस्तक वाचनाची चळवळ उभी करण्याची गरज आहे. सध्या माध्यमांमध्ये आचरट पणाशिवाय दुसरे काही दाखवले जात नाहीत. दूरदर्शन ही बिघडवणारी व्यवस्था आहे. आजूबाजूला कोणी कोणासाठी धावणार नाहीत माणसाचं पोरकेपण वाढत जाणार आहे. नव्या पिढीला अधिक सशक्त बनवण्याची गरज आहे 

मोबाईल आता जीवाशी खेळू लागला आहेत आणि माणसं त्याची गुलाम झाली आहेत. आपल्या पुढच्या पिढीला आपला भोवतल उघड्या डोळ्यांनी दाखवा. वाचणारा समाज अधिक समृद्ध असतो .माणसांच्या कर्तृत्वामध्ये पुस्तकांचा अधिक सहभाग आहे हे सांगण्याची गरज आहे.

राम कुतवळ म्हणाले की, लेखनामधून होणारी टीका स्वीकारण्याची वर्तमानात गरज आहे. त्यातून समाज प्रगल्भ आणि समृद्ध होत असतो. त्यामुळे समाजाचे वातावरण खूप निकोप  राह.ते आज दुर्दैवाने टीका केली तर सहन न करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. लेखक हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. तोच समाजामध्ये अधिक चांगले पेरण्याचे काम करतो असे मत व्यक्त केले. 

यावेळी घनश्याम पाटील यांचे बेधडक, गिरीश गोखले यांचे अरे सरकार सरकार, चंद्रलेखा बेलसरे यांचे ओव्हरटेक ,दिपाली जोगदंड यांचे विनफन या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांच्या संदर्भातील विवेचन प्रकाशक घनश्याम पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरे सर यांनी केले. आभार संदीप वाकचौरे यांनी मांडले.

 कार्यक्रमास सहसंचालक डॉ कमलादेवी आवटे ,सेवानिवृत्त सहसंचालक एम के गोंधळी ,अरुण कमलापूरकर, अरूण सांगोलकर, अरुण जाधव, रवींद्र कामठे, शुभांगी गिरमे, ज्योती घनश्याम, प्रमोद येवले, प्रशांत केंदळे, अजय रावत , मयूर बागुल आदींसह मोठ्या प्रमाणावर वाचक रसिक उपस्थित होते.

——-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button