इतर

लोणेश्वर विद्यालयात नशा मुक्त भारत अभियानाची प्रतिज्ञा

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय पारनेर केंद्राचा उपक्रम

पारनेर प्रतिनिधी :-
भारताला अंमली पदार्थ मुक्त करणे, अमली पदार्थांच्या सेवनाने होणारे दुष्परिणाम कमी करणे, व्यसनाधीन व्यक्ती साठी उपचार आणि पुनर्वसन सेवा उपलब्ध करणे आणि निरोगी जीवन शैलीला प्रोत्साहन देणे या साठी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय पारनेर केंद्र व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, पारनेर तालुका यांच्या विद्यमाने श्री भगवंत नाथुजी कोल्हे लोणेश्वर विद्यालय लोणी हवेली येथे ब्रह्माकुमारी साधना दिदी यांच्या संकल्पनेतून नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत विद्यालयातील विद्यार्थ्यां व्यसनमुक्तीचा प्रतिज्ञा करून घेतली.

या प्रसंगी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे राम भाई, पारसभाई, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पारनेर शहराध्यक्ष भगवानराव गायकवाड, लोणेश्वर ग्रामीण विकास मंडळ लोणी हवेली संस्थेचे संचालक नामदेव सोंडकर ( दाजी), मुख्याध्यापक बाळासाहेब दुधाडे सर, बाबाजी रेपाळे सर,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक देवराम बोरुडे सर, शिक्षक भास्कर लांडे सर, घनवट मॅडम, रवींद्र दातीर सर, बापू दुधाडे (सर) जासूद सर, संतोष साठे सर, कोल्हे सर तसेच जिल्हा परिषद, भास्कर लांडे (सर ),नरसाळे सर, कर्डिले मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.


नशा मुक्त भारत अभियान या विषयी मार्गदर्शन करताना ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या ब्रह्माकुमारी साधना दिदी यांनी सांगितले की, आज वर्तमान समयानुसार संपूर्ण विश्वामध्ये ताण तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक व्यक्ती टेन्शन घालवण्यासाठी अमली पदार्थांचे आहारी गेला आहे. असा गैर समज झाला आहे की अमली पदार्थांचे सेवन केले की ताण तणाव कमी होईल परंतु असे नाही तर थोड्या वेळासाठी दुःखाचा विसर पडेल पण परिस्थिती बदलणार नाही. मग का आपण आपले शरीर नशा करून शरीर रोगी बनवायचे, कॅन्सर सारख्या रोगांवर लाखो रुपये खर्च करून आजार बरा होत नाही, दारू पिऊन लिव्हर खराब होतो.सिगारेट व बिडीचे व्यसनाने फुफ्फुस खराब होते. जेवढे मूल्यवान शरीर आहे ते लाखो रुपये खर्च करूनही परत मिळणार नाही आणि म्हणूनच भारत सरकार मेडिकल विंग यांच्या अध्यक्षतेखाली नशा मुक्त भारत अभियान राबविण्यात आले.

दि.१३ ऑगस्ट २०२० ला या अभियानाची सुरवात झाली. या अभियानाला पाच वर्ष पूर्ण होत आहे. या पाच वर्षात ३ कोटी लोकांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली परंतु आज आपल्या संपूर्ण भारताला व्यसनमुक्त भारत बनवण्याची संकल्पना ही फक्त अभियान नाही तर एक जन आंदोलनाचे रूप पाहिजे. तेव्हाच आपले घर, आपली गल्ली, आपला गाव, आपला तालुका, आपले राज्य आपला देश व्यसनमुक्त होईल. येत्या २५ ऑगस्टला दादी प्रकाश मणीजी यांचा १८ वा स्मृती दिवसाची खरी श्रद्धांजली ठरेल.२५ ऑगस्ट हा विश्व बंधुत्व दिवस संपूर्ण भारतात साजरा केला जातो.
सूत्रसंचालन बाबाजी रेपाळे सर यांनी केले तर आभार ईश्वरीय परिवाराने मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button