जीवनाचा पासवर्ड सकारात्मक दृष्टिकोन- प्रा. प्रशांत देशमुख

शांताराम काळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा
‘
राजूर, प्रतिनिधी :
अकोले तालुक्यातील राजूर येथील श्री स्वामी समर्थ सेवा संस्थेचे सचिव व ज्येष्ठ पत्रकार शांताराम काळे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा. प्रशांत देशमुख यांनी ‘जीवन सुंदर आहे’ या विषयावर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. “जीवनाचा पासवर्ड म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन असून, मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम आवश्यक आहेत,” असा संदेश त्यांनी दिला.

श्री स्वामी समर्थ विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश टाकळकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. प्रशांत देशमुख, प्रा. एस. झेड. देशमुख, बाबासाहेब देशमुख, माधव गभाले, काशिनाथ साबळे, धोंडोपंत बांबळे, पांडुरंग भांगरे, श्रीनिवास वाणी, शंभू नेहे, प्रकाश महाले, गोकुळ कानकाटे, संतोष बनसोडे, अल्ताफ शेख,विलास तुपे ,सुरेश खांडगे, अनंत घाणे, राहुल राऊत, यांच्यासह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.
यावेळी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या समृद्ध ग्रंथालयाचे उद्घाटन तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात प्रकाश टाकळकर यांनी शांताराम काळे यांच्या पत्रकारिता, समाजकार्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव करत ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली अभ्यासिका व ग्रंथालय ही मोठी देणगी असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक प्राचार्या मंजुषा काळे यांनी केले. सूत्रसंचालन विनायक साळवे यांनी, तर आभार मुख्याध्यापक सतीश काळे यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


