ब्राम्हणवाडा येथे शालेय साहित्याचे वाटप

अकोले प्रतिनिधी
भारतीय बौद्धजन विकास समिती, पिंपरी चिंचवड पुणे या संस्थेतर्फे ब्राम्हणवाडा ता अकोले येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले

ब्राम्हणवाडा येथील मातोश्री लक्ष्मीबाई संगारे आश्रमशाळा तसेच खुंटेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ब्राम्हणवाडा गावचे सामाजिक कार्यकर्ते गौतम शिंदे यांच्या पुढाकारातून या शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी मातोश्री लक्ष्मीबाई संगारे आश्रमशाळा ब्राम्हणवाडा चे मुख्याध्यापक श्री. प्रकाश लांडगे , शिक्षक श्री. देठे सर खुंटेवाडी जि प शाळा शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. सदर संस्थेमार्फत सर्व विद्यार्थ्यांना लेखन साहित्य मिळवून देणारे श्री. गौतम शिंदे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला

भारतीय बौद्धजन विकास समिती मार्फत दरवर्षी लेखन साहित्याचा पुरवठा केला जातो यावर्षीही ब्राह्मणवाडा गावातील शाळांना लेखन साहित्याचे वाटप करण्यात आल्याचे गौतम शिंदे यांनी सांगितले

