इतर
इंदोरी येथील इंदुबाई रामभाऊ देशमुख यांचे निधन

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील श्री क्षेत्र इंदुरी येथील शेतकरी कुटुंबातील ज्येष्ठ आदर्श माता इंदुबाई रामभाऊ देशमुख वय 84 यांचे सोमवारी राहत्या घरी निधन झाले
त्या अतिशय कष्टाळू व मनमिळावू स्वभावाच्या होत्या त्यांनी आयुष्यभर शेती संस्कृती जोपासली त्यांच्या पार्थिव देहावर इंदोरी येथे प्रवरातीरी अंत्यसंस्कार करण्यात आले
या वेळी ग्रामस्थांसह सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
त त्यांच्या पश्चात एक मुलगा चार मुली पुतणे जावई नातवंडे असा परिवार आहे इंदुरी चे युवा सामाजिक कार्यकर्ते तथा विठ्ठल मंदिर ट्रस्टचे विश्वस्त श्री रवी शेठ देशमुख यांच्या मातोश्री होत्या
———



