इतर

समशेरपूर  येथील अगस्ती विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा भंडारदरा येथे  स्नेह मेळावा संम्पन्न

अकोले प्रतिनिधी 

अकोले तालुक्यातील  समशेरपूर  येथील अगस्ती विद्यालया च्या सन १९९७ – ९८ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा भंडारदरा येथे उत्साहात पार पडला.

         २७ वर्षांनी  एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी  जुन्या आठवणींचा धागा कायम ठेवून आयुष्याच्या शर्यतीत प्रत्येक जण आपल्या मार्गाने पुढे जात असतो अगदी तसाच अनुभव अगस्ती विद्यालयातील या विद्यार्थ्यांनी घेतला. भंडारदरा या रमणीय परिसरात दोन दिवस मुक्कामी राहुन भावनीक वातावरणात हा दिवस साजरा करण्यात आला. सर्वांचे स्वागत, सुख दुःख यावर चर्चा, जुन्या आठवणी, शाळेतील दिवस, शिक्षकांचे मार्गदर्शन, घरची परिस्थिती, मुलांचे शिक्षण, स्ट्रगल, गतकाळातील गंमती – जंमती यावर विचार मांडताना अनेकांच्या डोळ्यात पाणी तर चेहर्‍यावर हास्य उमटले. बालपणीच्या आठवणी चित्रपटा सारख्या डोळ्यासमोरून तरळून गेल्या.तर आपल्या मुलांवर संस्कार करावे, चांगले शिक्षण द्यावे, त्यांचे मोबाईल वापराचे प्रमाण कमी करावे, कुटुंबाकडे लक्ष द्यावे, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी हा विचार अशा विचारांची देवाण घेवाण करण्यात आली

                  यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अभंग, गीत – संगीत, कविता वाचन, विनोद, गप्पा, डान्स यामुळे वातावरण रंगुन गेले. हा स्नेह मेळावा म्हणजे केवळ एक भेट नव्हती, तर तो एकोप्याची जुनी मैत्री असा उत्सव ठरला. नोकरी व्यवसाय व जबाबदाऱ्यांच्या ओघात मैत्री दूर गेली तरी स्नेहबंध कायम राहतो. अशा भेटी आयुष्याला नवी ऊर्जा देतात. आठवणींचा हा प्रवास असाच सुरु राहो ही भावना सर्वांनी व्यक्त केली. एकत्रित चहा, नाष्टा, जेवणाचा आनंद घेतला.

                       सर्वांनी फेटे बांधून एकत्र फोटो काढले. अमृतेश्वराचे दर्शन घेऊन भंडारदरा परिसरातील पर्यटनाचा आनंद घेतला. सायंकाळी जेवणे उरकल्या नंतर निरोप घेताना मैत्रीची एक आठवण म्हणून ‘ विमल फोटो ‘ चे श्री एस. के. जाधव यांनी सर्वांना ग्रुप फोटो फ्रेम वेळेत बनवून दिली. असा हा आगळा वेगळा मित्रांचा ‘ स्नेहमेळा ‘ साजरा झाला.

                  यावेळी सामाजिक, शैक्षणिक, राजकिय, सांस्कृतिक, राजकिय, शेती, उदयोग – व्यवसाय, आरोग्य, संरक्षण दल, महापालिका अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील उच्च पदावर कार्यरत असणारे राम कोतवाल, खंडू ढोन्नर, अरुण बेणके,राहुल बेणके, संतोष भालेराव, भिवा सदगीर, शांताराम सदगीर, विलास दराडे, रामदास बेणके, दिपक जगताप, देवराम घोडसरे, दिपक शिंदे, श्रीकांत उघडे, धोंडू बेणके, गोरख आव्हाड, शांताराम सदगीर, नंदू मंडलिक, आशिष तळेकर, बहिरु सदगीर, रामचंद्र मेंगाळ, संपत सहाणे, किसन मोखरे, सुदाम मुखेकर, अशोक सदगीर, संतोष मंडलिक, बाळू तळपाडे, सुबोध भोसले  उपस्थित होते.

————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button