आयडीबीआय बॅंकेकडून टाकळी शाळेस विविध शालेय साहित्याचे वाटप

अकोले प्रतिनिधी
आयडीबीआय बॅंक शाखा अकोले यांच्याकडून सीएसआर निधीतून नुकतेच टाकळी जिल्हा परिषद शाळेला विविध शालेय उपयोगी साहित्य भेट देण्यात आले.
त्याअंतर्गत क्राॅम्टन कंपनीचे ४ हाय स्पीड सिलींग फॅन, १ संगणक ऑफिस टेबल तसेच ४ एलईडी ट्युबलाईटस् अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे साहेब यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती पुष्पाताई लहामटे व बॅंकेचे शाखाधिकारी श्री.मंडल साहेब यांच्या शुभहस्ते भेट देण्यात आल्या.
यावेळी टाकळी शाळा व्यवस्थापन समितीचे बाळासाहेब फोडसे, डॉ. जनार्दन मोरे, पोपटराव शेवाळे, दत्ताराम दातखिळे, संतोष नाईकवाडी उपस्थित होते.
आपुलकीच्या मिशन अंतर्गत टाकळी शाळेला दिलेल्या शालेय उपयोगी साहित्याबद्दल आयडीबीआय बॅंक परिवारातील सर्व मान्यवरांचे टाकळी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. श्रीनिवास पोतदार, सहशिक्षिक संजय देशमुख, दत्तात्रय देवगिरे, श्रीमती संगिता धिंदळे व निता लेंभे यांनी आभार व्यक्त केले.



