इतर

सावरचोळ (ता संगमनेर)येथे आश्रम शाळाविद्यार्थ्यां साठी जेई, निट चाळणी परीक्षा संपन्न..!

अकोले प्रतिनिधी


-आज दि.२०/०९/२०२५ रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय राजूर, ता. अकोले, जि. अहिल्यानगर अंतर्गत शासकीय व निमशासकीय आश्रमशाळेतील मार्च- 2025 मध्ये उत्तिर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात करीअर करण्यासाठी आदि.विकास विभागामार्फत दर वर्षी विभागीय पातळीवर चाळणी परीक्षा आयोजित करण्यात येते या परीक्षेव्दारे प्रत्येक विभागातील साठ विद्यार्थ्यांची निवड करून सदर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च आदिवासी विकास विभागामार्फत उचलला जात असुन आदिवासी विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात करीअरच्या संधी उपलब्ध करून दिली जात आहे.यासाठीची सन 2025 ची चाळणी परीक्षा
शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सावरचोळ ता. संगमनेर जि. अहिल्यानगर येथे चाळणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

जेई परीक्षेसाठी २२० विद्यार्थी व निट परीक्षेसाठी १०८ विद्यार्थी पात्र होते, असे एकुण राजुर प्रकल्प अंतर्गत सावरचोळ केंद्रावर ३२८ विद्यार्थी चाळणी परीक्षेसाठी पात्र होते.सदर परीक्षेचे एकुण १४ परीक्षाव्हाॅलमध्ये विद्यार्थ्यांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली होती.

एकूण जेई व निट परीक्षांसाठी १७७ विद्यार्थी उपस्थित होते.
परीक्षा दरम्यान विद्यार्थ्यांना भोजन, पिण्याचे स्वच्छ पाणी व आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. परीक्षा दरम्यान अपर आयुक्त कार्यालय नाशिक येथील सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. प्रदिप विशे यांनी भेट दिली.सदर परीक्षा पार पाडण्यासाठी प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. दिपक कालेकर, श्री. पंडित कदम यांनी केंद्र प्रमुख,तर आदिनाथ सुतार यांनी परीक्षा विभाग प्रमुख व नवनाथ गायकवाड यांनी केंद्र समन्वय म्हणून कामकाज पाहिले व परीक्षेसाठी श्री. शाम काबळे कार्यालयीन अधिक्षक व श्री. विकास साळवे आ.वि.नि व श्री. दामोदर कोरडे यांनी सहाय्यक म्हणून कामकाज पाहिले.

–__-=======

व्हाट्सअप ग्रुप 👇

https://chat.whatsapp.com/DtNO2iPaWBj4WjJLS95NDd?mode=ems_copy_t

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button