इतर

कातळापुरचे सरपंच बाळासाहेब ढगे यांना ग्रामरत्न सरपंच पुरस्कार जाहीर

भाऊसाहेब वाकचौरे

रुंभोडी प्रतिनिधी

कातळापुरचे सरपंच श्री बाळासाहेब सहादू ढगे यांना पंचायत राज विकास मंच संचलित कुरडू तालुका माढा जिल्हा सोलापूर या संस्थेच्या वतीने दिला जाणारा महाराष्ट्राचे ग्रामरत्न सरपंच हा पुरस्कार नुकताच जाहीर झाला

दि 7 व 8 ऑक्टोबर रोजी लोणावळा येथे अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे श्री बाळासाहेब ढगे यांनी आदिवासी डोंगराळ व ग्रामीण भागात पेसा भागात ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक विकास कामे केली

गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ महिला तरुण शालेय विद्यार्थी यांच्या सहकार्यातून गाव हागणदारी मुक्त ग्रामस्वच्छता अभियान या माध्यमातून गावाला संत गाडगेबाबा हागणदारी मुक्त गाव त्याचबरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छता अभियान हे उपक्रमात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली गावांतर्गत रस्ते काँक्रिटीकरण सुशोभीकरण वृक्ष लागवड जिल्हा परिषद शाळेचे सुशोभीकरण करण्यात आले याचबरोबर गावातील तंटामुक्ती अभियान व्यसनमुक्त गाव या उपक्रमाचा अतिशय महत्त्वपूर्ण सहभाग त्यांनी नोंदविला त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला

हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे उपसरपंच श्रीमती लक्ष्मीबाई खाडगीर,सकरू खाडे, लक्ष्मण शिंदे, धोंडू ढगे,सुमनताई ढगे,आशाताई तातळे, योगिताताई काठे, सुरेश गावडे,दत्तू सूर्यवंशी,सोमनाथ भांगरे,सम्राट ढगे, रंजना काठे,ललिता नाडेकर, पत्रकार भाऊसाहेब वाकचौरे आदींनी अभिनंदन केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button