इतर
प्राचार्य पदी शेख लतीफ शेख जानी यांची निवड

हिंगोली दि 12
कळमनुरी, ता . कळमनुरी, जि. हिंगोली येथील नामांकित शाळा गुलाम नबी आझाद उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यपदी बोलडा येथील मुळनिवासी असलेले प्राध्यापक शेख लतीफ शेख जानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शासकीय कामाचा दांडगा अनुभव असणारे प्राध्यापक शेख लतीफ शेख जानी हे पुणे येथील टायलेंट कट्टा प्रायोजित महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित आहेत अशा गुणवान शिक्षकांची प्राचार्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. प्राचार्य शेख लतीफ शेख जानी हे सुप्रसिद्ध कवी शफी बोल्डेकर यांचे धाकटे बंधू आहेत.



