इतर

महावितरण कंपनीच्या कारभाराच्या विरोधात धामणगाव पाट मध्ये शेतकरी, ग्रामस्थ, आक्रमक

कोतुळ प्रतिनिधी

धामणगाव पाट मध्ये आज महावितरण कंपनीच्या कारभाराच्या विरोधात गावातील शेतकरी, ग्रामस्थ, महिला भगिनी व युवा दूध उत्पादक शेतकरी यांच्या उपस्थितीमध्ये पुढील मागण्या संदर्भात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले .
1•ग्रामीण सिंगल फेज सप्लाय पूर्ण दाबाने देणे
2•अर्बन लाईन चा विस्तार करणे
3•शेतीपंपासाठी दिवसा विद्युत पुरवठा करणे
या प्रमुख मागण्यांसाठी धामणगाव पाट मधील पदाधिकाऱ्यांनी वीज मंडळाच्या कारभारावर सडकून टीका केली, यामध्ये महिला शेतकऱ्यांनी विजेच्या प्रश्न संदर्भात विचारणा केली, असता राजूर विभागाचे महावितरणचे अधिकारी या ठिकाणी पोलिसांच्या मदतीने या आंदोलन स्थळी उपस्थित झाले विजेच्या मागणी संदर्भातील निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आणि जोपर्यंत मागण्यांसंदर्भात लेखी देत नाही तोपर्यंत आंदोलन अशाच पद्धतीने चालू राहील अशी भूमिका शेतकऱ्यांनी व आंदोलनकर्त्यांनी घेतली यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी लेखी देण्याचे शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव मान्य केले आणि लेखी स्वरूपात दिल्यानंतर आंदोलन पोलिसांच्या मध्यस्थीने तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आले यावेळी धामणगाव पाट ग्रामपंचायतीचे उपसरपंच बाळासाहेब भोर , अजित चौधरी तसेच करंडी गावचे माजी सरपंच चंद्रकांत गोंदके, कॉम्रेड सदाशिव साबळे तसेच बाजार समितीचे उपसभापती रोहिदास भोर यांनी विजेच्या संदर्भात व्यथा मांडल्या यावेळी, पोलीस पाटील लक्ष्मण चौधरी,सरपंच दीपक पारधी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन भास्कर वाघ , गवराम चौधरी,माजी सरपंच अशोक शेळके चेअरमन रेवचंद्र भोर ग्रामपंचायत सदस्य सचिन भोर, सुधीर भोर, माजी सरपंच सुभद्रा हेंबाडे, रावसाहेब भोर, विश्वनाथ जगधने, निलेश घुले ,दीपक चौधरी, नवनाथ मालुजकर, सूर्यभान मालुजकर, अनिल मालुजकर, राजू मालुजकर, राजेंद्र चौधरी, संदीप चौधरी, पंढरीनाथ शेळके, मनीषा मालुजकर व इतर ग्रामस्थ महिला भगिनी व तरुण वर्ग या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button