इतर

लायन्स क्लब ऑफ संगमनेरचे वतीने मोफत प्लॅस्टिक शस्त्रक्रिया शिबीर संपन्न 

                   

संगमनेर: प्रतिनिधी

डॉ शरदकुमार दिक्षीत यांचे स्मृतीप्रित्यर्थ लायन्स क्लब ऑफ संगमनेर आयोजित मोफत प्लॅस्टिक शस्त्रक्रिया शिबीर दि ११ व १२ जानेवारी २०२६ या कालावधीत डॉ प्रविणकुमार पानसरे यांच्या धन्वंतरी हॉस्पिटल येथे संपन्न झाल्याची माहिती प्रकल्प प्रमुख डॉ सुचित गांधी व राणीप्रसाद मुंदडा यांनी दिली 

याबाबत अधिक माहिती देताना डॉ गांधी यांनी सांगीतले की लायन्स क्लब ऑफ सगमनेर गेली २६ वर्षे मोफत प्लॅस्टिक शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करीत आहे,फाटलेले ओठ,टाळूवरील छिद्रे,तिरळेपणा,शरीरा वरील विवीध प्रकारचे व्रण,डाग,गाठी,वाकडे नाक,कान तसेच जन्मत: हाता पायांच्या बोटांची व्यंगे आदीप्रकारच्या व्यंग्य असलेल्या व्यक्ती न्यूनगंडामुळे समाजात मोकळेपणाणे वावरत नाहीत अनेकांची लग्न रखडलेली असतात तर काहींना नोकरी मिळत नाही,दैनंदिन काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते अशा गरजवंत रूग्णांच्या शस्त्रक्रिया या शिबीरात करण्यात येतात 

अमेरिकेचे सुप्रसिद्ध प्लॅस्टिक सर्जन डॉ शरदकुमार दिक्षीत यांचे सहयोगी डॉ लेरी वेनस्टन व डॉ व्हिटने आणी सहकारी अमेरिकेहून येऊन या दोन दिवसाच्या शिबीरात शस्त्रक्रिया केल्या आहेत 

या दोन दिवसांत सुमारे १५० रूग्णांची तपासणी होऊन साधारण पणे ४७ प्रकारच्या शस्त्रक्रिया या शिबीरात करण्यात आलेल्या आहेत 

दुभंगलेले ओठ, वाकडे कान व नाक, कानामागील मोठा गळू, चेह-यावरील गालावर वाढलेली मोठी गाठ ,हाताची पायाची चिकटलेली बोटे, विवीध प्रकारचे व्रण व गाठी आदी प्रकारच्या व्यंगांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या

या शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ लेरी वेनस्टन म्हणालेकी लायन्स क्लब ऑफ संगमनेर गेली अनेक वर्षे सातत्याने या शिबीराचे आयोजन करीत असून मानवतेचे हे सेवा कार्य अभिनंदनीय आहे ,धन्वंतरी हॉस्पिटलचे डॉ प्रविणकुमार पानसरे म्हणालेकी शाररिक वैगुण्यामुळे त्रस्त नागरिकांना या शिबीरामुळे मोठा फायदा होत आहे या मुळे हे रूग्ण समाजाच्या मुख्य प्रवाहात आत्मविश्वासाने सहभागी होऊ शकतील ,डॉ वेनस्टन हे भारतात येऊन ख-याअर्थाने संतांचे कार्य करीत आहे त्यांना सहकार्य करण्याची संधी मिळाल्याने आम्ही स्वत:ला भाग्यवंत समजतो

सदरचे शिबीर चालू असताना  माजी आमदार डॉ सुधिरजी तांबे,  मालपाणी उद्योग समुहाचे संचालक व आंतरराष्ट्रिय लायन्स क्लबचे बहुप्रांतीय परिषदेचे माजी चेअरमन ला गिरीषजी मालपाणी,  नगराध्यक्षा डॉ मैथिली तांबे, ओम मयूर ज्वेलर्सचे महेश मयूर ,मर्चंट बँकेचे चेअरमन मधुसूदन नावंदर ,आशिष बुब ,एकनाथराव पानसरे आदींनी सदिच्छा भेट देऊन शिबीरार्थींची विचारपुस केली व क्लबच्या उपक्रमाचे कौतुक केले 

 याशिबीरासाठी रामनारायण बुब मेमोरियल ट्रस्ट यांचे बहुमोल असे आर्थिक सहकार्य मिळाले असून संग्राम नागरी सहकारी पतसंस्था,मालपाणी उद्योग समुह,संगमनेर मर्चंटस बँक,अमृतवाहीनी सहकारी बँक, विजय नागरी सहकारी पतसंस्था,शारदा नागरी सहकारी पतसंस्था,विजय नागरी सहकारी पतसंस्था, ओम मयुर ज्वेलर्स यांचेही आर्थिक योगदान लाभले आहे ,धन्वंतरी हॉस्पिटल व उमागौरी वुमेन्स फाऊंडेशन यांचे शिबीरासाठी मोठे सहकार्य मिळाले असल्याची माहिती क्लबचे अध्यक्ष ला संजय आसावा यांनी दिली या शिबीरासाठी डॉ अनिकेत कासार,डॉ रसिका वाघोलीकर,डॉ सौ दातीर,डॉ विनीत सुखटनकर यांनी भुलतज्ञ व डॉ हासे यांनी बालरोग तज्ञ म्हणून सेवा दिल्याची माहीती सह प्रकल्प प्रमुख चेतन कर्डिले यांनी दिली  

शिबीर यशस्वीतेसाठी डॉ सुचित गांधी,राणीप्रसाद मुंदडा,चेतन कर्डिले, श्रीनिवास पगडाल,प्रकाश कलंत्री,अमोल खटाटे,डॉ अभय चोरडिया,बबीता आसावा,केदार राठी,योगेश कोळपकर,वैभव शहा,विलास क्षत्रीय, बापुसा टाक,राजाभाऊ सोमाणी आदींनी विशेष परिश्रम घेतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button