इतर

अकोल्यातील आदिवासी कन्येची उपजिल्हाधिकारी पदी निवड!  गावात  काढली मिरवणूक 

राजूर प्रतिनिधी

 अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील वांजुळशेत गावची कन्या आणि मवेशी गावची सुनबाई  श्रीमती प्रीतीताई बाजीराव वाळेकर यांना उपजिल्हाधिकारी पदी नियुक्ती मिळाली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा 2024 परीक्षेत अनु जमाती महिला प्रवर्गातुन महाराष्ट्र राज्यात प्रथम येण्याचा त्यांनी मान पटकावला. यामुळे त्यांना थेट उपजिल्हाधिकारी पदी नियुक्ती मिळाली.

या निमित्ताने मवेशी गावाच्या वतीने या आदिवासी कन्ये चा भव्य सत्कार मायभूमीत करण्यात आला .संपुर्ण गावातुन मिरवणूक काढत या कन्येवर ग्रामस्थांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.उडदावणे येथील आदिवासी कांबडनृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.हा क्षण मवेशी आणि वांजुळशेत गावासाठी, आदिवासी समाजासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरला हे गौरवशाली यश तालुक्यातील नव्या पिढी ला नक्कीच प्रेरणा देणारे आहे

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यमाजी लहामटे गुरुजी होते.यावेळी नामदेव गंभिरे ,बी.के.घोडे ,सोमनाथ वाळेकर,पोपेरे ,सुर्यभान गोडे ,हिले  , दत्तात्रय लांघी  आदिंनी या लाडक्या कन्येला शुभेच्छा देतांना केवळ या पदावर न थांबता पुढील ध्येय निश्चित करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.भविष्यात अधिकारी पदावर काम करताना आपल्या समाजाला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करावा असे सांगण्यात आले.

कठोर मेहनतीमुळे यशाला गवसणी!

आपल्या सत्काराला उत्तर देताना प्रीतीताई यांनी कठोर मेहनत,जिद्द, चिकाटी यांमुळे हे यश मिळाले असुन वाळेकर आणि भांगरे कुटुंबांच्या सपोर्टमुळे मी यशाला गवसणी घालु शकले असे त्या म्हणाल्या.

या कार्यक्रमाला आदिवासी भागातील अनेक मान्यवर तसेच ग्रामस्थ,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्ती चौधरी  यांनी तर आभार भास्कर भांगरे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button