शेणित येथील राजा हरिश्चंद्र विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप!

स्वप्न साकार करण्यासाठी अनेक संधी आहेत
संधीचे सोने करण्यासाठी जिद्द सोडू नका – डॉ. दमयंती बुळे
एस. के. जाधव /महादर्पण प्रतिनिधी
कोकणवाडी दि. १८ अकोले तालुक्यातील राजा हरिश्चंद्र माध्यमिक विद्यालय ठोकळवाडी येथे ग्रामविकास व शिक्षण प्रसारक मंडळ शेणीत या संस्थेच्या वतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला . शाळेचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब दातीर यांनी मान्यवरांचे स्वागत केले व कार्यक्रमाचे प्रस्तावित केले.

कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉ. दमयंती बुळे विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाल्या,” आपले स्वप्न साकार करण्यासाठी डॉक्टर, इंजिनियर, नर्सिंग कोर्स अशा अनेक संधी आहेत संधीचे सोने करण्यासाठी सतत कष्टाने अभ्यास करा, जिद्द सोडू नका. हे वय अल्लड असते, या वयात शारीरिक मानसिक बदल घडत असतो तेव्हा दैनंदिन जीवनात खेळ, व्यायाम यांना महत्त्व द्या,सतत निर्व्यसनी रहा असे सांगितले

यावेळी विद्यार्थी गणपत शिंदे, पूजा लोहकरे, वैष्णवी घाटकर,ईश्वर डामसे,शुभम धोंगडे,अंकिता तळपे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर श्री घनश्याम नवले,श्री तुकाराम बेनके, जि. प. प्राथमीक शाळेचे श्री सुधाकर भांगरे, नागोलू तारकर रेड्डी, माजी केंद्रप्रमुख सौ सुलभा लांघी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या
संस्थेचे अध्यक्ष श्री एम. एम. लांघी यांचे अध्यक्षीय भाषण झाले. विद्यार्थ्यांनी शाळेला छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचे फोटो फ्रेम सप्रेम भेट दिले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब दातीर जि. प. प्राथमीक शाळेचे मुख्याध्यापक श्री तुळशीराम गभाले, श्री सुधाकर भांगरे, श्री घनश्याम नवले, श्री तुकाराम बेनके, संस्थेचे खजिनदार श्री मुरलीधर तळपे, श्री नागोलू तारकराम रेड्डी, मार्टिकल मिन्थलू, डॉ. सौ दमयंती बुळे, माजी केंद्रप्रमुख सौ सुलभा लांघी, श्री विजय बडे श्री नारायण धोंगडे, श्री अशोक लांघी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादर्पण चे प्रतिनिधी श्री संतु जाधव यांनी केले व श्री घनश्याम नवले यांनी उपस्थितांचे आभार मानले.



