इतर

जायनावाडी येथे पारंपारिक पद्धतीने होळी उत्सव साजरा.


अकोले प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील जायनावाडी,एकदरे या गावामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी होळी उत्सव मोठया आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.

पारंपारिक पद्धतीने दोन दिवशी होळी सण साजरा होतो. आदल्या दिवशी लहान होळी व दुसऱ्या दिवशी मोठी होळी असे संबोधले जाते.
होळीची संबंधित एक आख्यायिका राजा हिरण्यकशिपू भगवान विष्णूचे अनुयायी असलेला त्याचा मुलगा प्रल्हाद आणि त्याचे मावशी होलिका या राक्षसाची कथा सांगते.पण त्याचे रक्षण करण्यासाठी प्रल्हादाने भगवान विष्णूची प्रार्थना केली.होळीच्या आदल्या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याच्या स्मरणार्थ होलीका दहन साजरा केला जातो.प्रत्येक घरातील स्त्री ही परंपरेनुसार पुरणपोळीचा,एक गाठी,खोबऱ्याची वाटी,याचा नैवेद्य दाखवतात.होळीच्या भोवताने पाच फेऱ्या मारतात.आपल्या काही मनोकामना प्रार्थना होळीच्या दिवशी अर्पण करतात.होळी हा सण शिमगा धुलीवंदन वर्षातील मोठा सण म्हणून साजरा करतात.

आपल्या रूढी परंपरेनुसार ढोल ताशाच्या गजरात होळी खांबाची मिरवणूक काढतात. वाजत गाजत गावातील तरुण मंडळी हे होळीचा खांब अगदी थाटामाटात वाजवीत गावातून आणतात.सर्व बाल गोपाळ ,महिला या होळी सणाचा आनंद घेतात.होळीही दोन दिवस राखली जाते. गावातील जुनी लोक पारंपारिक नृत्य साजरे करतात.यावेळी गावातील काही महिलांनी होळी सन आदिवासी परंपरानुसार गाणे म्हणून होळी सण साजरा केला.
यावेळी उपस्थित गावातील सर्व ग्रामस्थ महिला बालगोपाळांंनी या होळी सणाचा आनंद घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button