इतर

खासदार मेधाताई कुलकर्णी यांच्या हस्ते पुण्यात स्मार्ट सखी गौरव पुरस्कार वितरण

संजय उकिरडे

पुणे – पत्रकार भवन येथे स्मार्ट सखी ग्रुपतर्फे महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला “स्मार्ट सखी गौरव पुरस्कार २०२६” कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून राज्यसभा खासदार मा. सौ. मेधाताई कुलकर्णी उपस्थित होत्या.
त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.मा.पायल जोशी व मा.सुजाता गुरव यांनाही यावेळी विशेष सन्मानित करण्यात आले.संगीत, समाजकार्य, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांना या कार्यक्रमात गौरविण्यात आले.कार्यक्रमात हिंदी-मराठी गाण्यांचा सुरेल नजराणा सादर करण्यात आला.उपस्थित कलाकारांनी सुंदर गायन सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली.स्मार्ट सखी ग्रुपच्या संचालिका वृषाली महाजन आणि सीमा सुंतार यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले.


त्यांच्या पुढाकारामुळे अनेक महिलांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली.कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या कर्तृत्वाचे कौतुक केले.
यावेळी विविध मान्यवर पाहुण्यांनी महिलांच्या सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन केले.समाजात महिलांचे योगदान मोठे असून त्यांचा सन्मान होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाला पुणे शहरातील अनेक नागरिक, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमामुळे महिलांच्या कला व कर्तृत्वाला एक व्यासपीठ मिळाले.शेवटी आयोजकांनी सर्व मान्यवर, कलाकार आणि उपस्थितांचे आभार
मानले.महिलांच्या प्रगतीसाठी अशा उपक्रमांचे आयोजन पुढेही करण्यात येणार असल्याची माहिती वासंती वायचळ यांनी दिली.

पुणे जिल्हा व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/GevxUmVFhtHEZn653MWOmu?mode=hq1tcla

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button