अरविंद गाडेकर यांच्या कथासंग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर.
‘
संगमनेर :- अक्षरसागर साहित्य मंच गारगोटी, कोल्हापूर यांचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार २०२५ साहित्यिकांना जाहीर झाले आहेत. कादंबरी, कवितासंग्रह, संकीर्ण , बालसाहित्य या प्रकारातील पुरस्कार मंचाचे अध्यक्ष डॉ.मा.ग.गुरव (राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक) व पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य यांनी जाहीर केले आहे.
संगमनेरचे प्रसिद्ध व्यंगचित्रकार , लेखक व व्याख्याते अरविंद गाडेकर यांना त्यांचे स्वलिखित कथासंग्रह ‘ मनातलं पानावर ‘ या कथासंग्रहास राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी अनेक लेख लिहिले असून त्यांच्या लेख अनेक दैनिक, साप्ताहिकात प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या कथा समाज जीवनातील , सामान्य माणसातील रोजच्या निगडित घटनावर आधारित असतात. अरविंद गाडेकर हे संगमनेर साहित्यिक मंडळाचे अध्यक्ष , तसेच अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्था ,संगमनेर शाखेचे कार्याध्यक्ष आहेत. संगमनेर वाचन कट्टा आणि संगमनेर साहित्यिक मंडळाचे वाचन मंडळ या माध्यमातून वाचन चळवळ व साहित्यिक चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी ते सतत कार्यरत असतात. ‘ साहित्य कुंज ‘ या मासिकाचे ते संपादक आहेत. त्यांच्या या पुरस्काराबद्दल समाजातील सर्वस्थरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
अरविंद गाडेकर यांना प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक डॉ.संतोष खेडलेकर , दै.युवावार्ताचे संस्थापक संपादक किसन भाऊ हासे व साहित्यिक,लेखक अनिल देशपांडे आणि संगमनेर साहित्यिक मंडळाचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य असते.



