आज नाशिक भूषण’ व ‘रोटरी भूषण’ पुरस्कार प्रदान सोहळा!

नाशिक प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ नाशिक आयोजित ‘नाशिक भूषण’ व ‘रोटरी भूषण’ पुरस्कार प्रदान सोहळा आज शुक्रवारी आयोजित केला आहे
रोटरी क्लब ऑफ नाशिक तर्फे देण्यात येणारा यंदाचा नाशिक भूषण 2025 -26 पुरस्कार उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पियुष सोमानी यांना जाहीर झाला आहे. तर रोटरी भूषण पुरस्कार सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन रोटे. डॉ. राजेंद्र नेहेते व सुप्रसिद्ध व्यावसायिक रोटे. विलास शिरोरे यांना घोषित करण्यात आले आहेत.
शुक्रवार दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी संध्या़. सहा वाजता गुरुदक्षिणा सभागृह, कॉलेज रोड, नाशिक येथे प्रख्यात आयटी तज्ज्ञ व लेखक डॉ. उदय निगुडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
तरी या पुरस्कार प्रदान सोहळ्यास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष डॉ.गौरव सामनेरकर , सेक्रेटरी सी ए रेखा पटवर्धन, प्रकल्प सचिव मकरंद चिंधडे, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष सीए उदयराज पटवर्धन व जनसंपर्क संचालक एडव्होकेट विद्युल्लता तातेङ यांनी केले आहे.


