इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.२५/०४/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख ०५ शके १९४८
दिनांक :- २५/०४/२०२६,
वार :- मंदवासरे(शनिवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:०७,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:४८,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- सौर ग्रीष्मऋतु
मास :- वैशाख
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- नवमी समाप्ति १८:२९,
नक्षत्र :- आश्लेषा समाप्ति २०:०५,
योग :- गंड समाप्ति २३:४३,
करण :- बालव समाप्ति ०६:५१, तैतिल ३०:१४,
चंद्र राशि :- कर्क,
रविराशि – नक्षत्र :- मेष – अश्विनी,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- वृषभ,
राशिप्रवेश :- राशीप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ०९:१७ ते १०:५२ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
शुभ मुहूर्त — सकाळी ०७:४२ ते ०९:१७ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०२:०२ ते ०३:३७ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०३:३७ ते ०५:१३ पर्यंत,

❀ दिन विशेष:
दग्ध १८:२९ प.,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख ०५ शके १९४८
दिनांक = २५/०४/२०२६
वार = मंदवासरे(शनिवार)

मेष
आज आपले मन अधिक संवेदनशील बनेल. त्यामुळे कोणाचे बोलणे किंवा वागणे यामुळे मनाला दुःख होईल. मानसिक भीती बरोबर शारीरिक अस्वस्थतेमुळे आपण बेचैन व्हाल. आईचे स्वास्थ्य खराब असेल. वाहन चालविताना सावधानी बाळगा. आणखी वाचा

वृषभ
आज चिंतेपासून मुक्तता मिळाल्याने आपण स्फूर्ती व उत्साह अनुभवाल. हळवेपणा व काल्पनिकता यांच्या जगात वावराल. आपल्या अंतर्गत कला व साहित्य बाहेर येण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबीयांकडे चांगले लक्ष राहील. आणखी वाचा

मिथुन
आज काम होण्यास वेळ लागला तरी प्रयत्न चालू ठेवणे हितावह राहील. कामे नक्की पूर्ण होतील. आर्थिक योजनात सुरुवातीला काही अडचणी येतील पण नंतर मार्ग मोकळा होताना दिसेल. आणखी वाचा

कर्क
आजचा दिवस सर्व दृष्टीने आनंददायी आहे. शारीरिक व मानसिक दृष्टया स्वस्थ व आनंदी राहाल. आप्तेष्ट व कुटुंबीयां कडून सौख्य व आनंद ह्यांची प्राप्ती होईल. तसेच त्यांच्या कडून काही भेटवस्तू मिळतील. प्रवास आनंददायी होईल. आणखी वाचा

सिंह
आज आपण अती भावनाशील व्हाल. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. दलाली, चर्चा व वाद ह्या पासून दूर राहणे हितावह राहील. कोर्ट – कचेरीच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल.

कन्या
आजचा दिवस लाभदायी आहे. विविध पातळ्यांवर यश, कीर्ति व लाभ होतील. धन प्राप्ती होईल. मित्र – मैत्रिणीं कडून काही लाभ संभवतात. प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे मन आनंदित होईल. व्यापारात धन वृद्धी संभवते.

तूळ
आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात व कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. नोकरीत बढतीची संधी लाभेल. कौटुंबिक जीवनात आनंद व उत्साहाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.

वृश्चिक
आज नोकरी – व्यवसायाच्या ठिकाणी सावधपणे कामे करावी लागतील. . वरिष्ठांच्या नकारात्मक धोरणाने तुम्हाला त्रास होऊ शकतो. दिवस आळसात जाईल. संततीशी मतभेद होण्याची शक्यता आहे.

धनु
आत्यंतिक संवेदनशीलतेमुळे मनःस्थिती दुःखी होईल. पाण्या पासून सावध राहावे लागेल. उक्ती व कृती संयमित ठेवावी लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अवैध कामांपासून दूर राहणे हितावह राहील.

मकर
विविध कारणांनी आपल्या व्यापाराचे विस्तृतीकरण होऊन त्यात वाढ होईल. दलाली, कमिशन, व्याज इत्यादी मार्गांनी उत्पन्नात वाढ होईल. धन लाभ संभवतो. संततीच्या अभ्यासा विषयी चिंता निर्माण होईल. कामात यश मिळेल.

कुंभ
आजचा दिवस आनंददायी आहे. कामात यश तसेच कीर्ती मिळेल. कुटुंबियांसह दिवस चांगला जाईल. नोकरी – व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील.

मीन
आज आपण काल्पनिक जगात रमून जाल. विद्यार्थ्यांना आपली हुशारी दाखविता येईल. प्रणयाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. पाण्या पासून शक्यतो दूर राहावे.मानसिक संतुलन सांभाळावे लागेल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button