इतर

जेऊर (बा.) येथे श्री संतुकनाथ विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती साजरी.

संजय उकिरडे/ प्रतिनिधी

अहिल्यानगर –श्री संतुकनाथ इंग्लिश विद्यालय व उच्च माध्यमिक कला व विज्ञान विद्यालय जेऊर (बा.) येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक व थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 139 वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.


आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत गीताने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे सचिव श्री शिवाजीराव भोर साहेब होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री अक्षय शेट कटारिया व श्री गिरीश मगर उपस्थित होते.


विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शांताराम नवले सरांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. विद्यालयाचे उपप्राचार्य श्री अरविंद सोनावळे सरांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. कैलास आठरे सरांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य श्री मोकाटे अण्णा यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यालयाचा विद्यार्थी पवारा रुद्र याने आपल्या भाषणातून कर्मवीर अण्णांची ओळख करून दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी भोर यांनी अण्णांच्या जीवनातील अनेक प्रसंग विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून सांगितले.
यावेळी कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ, विद्यार्थी सुरक्षा समिती व सखी सावित्री समितीचे सर्व अध्यक्ष ,उपाध्यक्ष. सदस्य तसेच पंचक्रोशीतील सर्व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती युगंधरा पाडळे व सविता कार्ले मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री अशोक साळवे सरांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रम उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button