श्री रघुनाथ जगताप यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार

संजय उकिरडे /प्रतिनिधी
श्रीरामपूर – अहिल्यानगर जिल्हा परिषद आणि अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा गुणवंत मुख्याध्यापक हा पुरस्कार यावर्षी संगमनेर तालुक्यातील सिद्धार्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. रघुनाथ मल्हारी जगताप यांना देण्यात आला.
गेली ३४ वर्ष बहुजन शिक्षण संघामध्ये जगताप यांनी सेवा केली. महात्मा फुले विद्यालय ,घुलेवाडी येथून त्यांच्या सेवेची सुरुवात झाली. इंग्रजी विषय शिकवताना त्यांनी विविध उपक्रम विद्यार्थ्यांसाठी सुरू केले. शासनाचे विविध उपक्रम विद्यालय आणि तालुक्यातील विविध शाळांमधून राबविण्यासाठी मेहनत घेतली. सिद्धार्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक पद स्वीकारल्यानंतर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विविध प्रकल्प आणि उपक्रम विद्यालयात आयोजित केले. या सर्व शैक्षणिक कार्याची नोंद घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
अहिल्यानगर येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार नाशिक पदवीधर मतदार संघाचे आ. श्री सत्यजित तांबे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
प्रसंगी अहिल्यानगरचे आमदार जगताप ,धनंजय जाधव महापौर आणि मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी, शिक्षक, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.लोकनेते बाळासाहेब थोरात जय उत्कर्षा ताई रुपवते हिंद लोक चळवळीचे संस्थापक डॉ.सुधीर तांबे, बहुजन शिक्षण संघाचे कार्यकारी विश्वस्त विश्वस्त संघराज रूपवते, श्रीरामपूर येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये सर्व विश्वस्त, सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले.



