हरित सेना अंतर्गत कोतुळेश्वर विद्यालयात वृक्षारोपण

कोतुळ प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या कोतुळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हरित सेना विभागाच्या वतीने विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी रयत शिक्षण संस्था, सातारा येथील आर्किटेक्चर/इंजिनियर श्री. निकम पाटील यांनी पर्यावरणाच्या संतुलनासाठी झाडे लावणे व त्यांचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. श्री. निकम पाटील व उत्तर विभाग, अहिल्यानगरचे बिल्डिंग सुपरवायझर श्री. नलगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी यतीन एंटरप्रायजेस, नाशिकचे कॉन्ट्रॅक्टर अजय काकडे उपस्थित होते. विद्यालयाचे प्राचार्य श्री. गोडे जे. बी. यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
कार्यक्रमास पर्यवेक्षक श्री. शिंदे टी. डी., ज्येष्ठ शिक्षक श्री. देशमुख टी. पी., श्री. उकिरडे सर, हरित सेना विभागप्रमुख श्रीम. साबळे व्ही. सी., श्री. खतेले सर व श्री. सारोक्ते सर उपस्थित होते.
वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कार्यक्रम उत्साहात पार पडला.



