योग्य व्यक्तींना मिळालेले पुरस्कार नेहमीच समाजभूषण ठरतात – प्रा. अशोकराव सोनवणे

संजय उकिरडे
श्रीरामपूर ()- विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानने प्राचार्य डॉ. गोरख बारहाते, डॉ. वसंतराव जमधडे, वासुदेव भांबारे यांना असे मिळालेले पुरस्कार म्हणजे योग्य व्यक्तींचा खरा गौरव असल्याचे मत नाशिक येथील चरित्रलेखक प्रा. अशोकराव सोनवणे यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील आगाशे सभागृहात विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे सेवाभावी कार्यात समर्पित व्यक्तींना सन्मानीत करण्यात आले, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अशोकराव सोनवणे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजीव रावसाहेब शिंदे होते.
प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी.ई. शेळके, बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रकाश मेहकरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रतिमापूजन, दीपप्रज्वलन होऊन कार्यक्रमास प्रारंभ झाला. चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांच्या आठवणी सांगत डॉ. शिवाजी काळे यांनी श्रद्धांजलीची सूचना मांडली. स्वागत व प्रास्ताविक प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी केले. उपाध्यक्ष, समन्वयक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
राष्ट्रीय शिक्षक दिनाचा राज्यस्तरीय आदर्श प्राध्यापक पुरस्कार माजी प्राचार्य डॉ. गोरख बारहाते यांना, स्व. डॉ. वा.ग. तथा बाबासाहेब कल्याणकर स्मृती राज्यस्तरीय धन्वंतरी पुरस्कार डॉ. वसंतराव जमधडे यांना तर स्व. नामदेवराव विश्वनाथ सुकळे स्मृती राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार वासुदेव बन्सीलाल भांबारे यांना प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ, पुस्तके देऊन तिन्ही मान्यवरांना सन्मानीत करण्यात आले. मानपत्रांचे वाचन प्रा. शिवाजीराव बारगळ, प्रसन्न धुमाळ, डॉ. शिवाजी काळे यांनी केले.
प्रा. अशोकराव सोनवणे यांनी आपल्या भाषणातून विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानच्या निरपेक्ष सेवाकार्याचा गौरव केला. सुखदेव सुकळे हे कोणाकडूनही देणगी अथवा आर्थिक मदत स्वीकारत नाहीत. मिळालेल्या अल्पपेन्शन रकमेतून सेवाकार्य करतात. बऱ्याच संस्था पुरस्कार विकतात, व्यक्ती विकत घेतात पण विश्वलक्षी ग्रामीण प्रतिष्ठान स्वखर्चाने योग्य व्यक्तींना सन्मानीत करतात. महात्मा गांधी, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबा आमटे ,डॉ. अण्णासाहेब शिंदे, ॲङ् रावसाहेब शिंदे यांचा आदर्श श्रीरामपुरात जोपासला जातो, हे कौतुकास्पद असल्याचे प्रा. सोनवणे यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. गोरख बारहाते, डॉ. वसंतराव जमधडे, वासुदेव भांबारे यांनी सत्काराला उत्तर दिले. डॉ. राजीव शिंदे यांनी अध्यक्षीय भाषणातून तिन्ही पुरस्कार्थींचे कौतुक करून चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांच्या आठवणी सांगत श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यात १४ तालुक्यातून चेसमध्ये पहिला आलेला विद्यार्थी साईराज दिनेश वाडणकर यास सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ शंकरराव गागरे,प्राचार्य डॉ. एकनाथ ढोणे, डॉ. रवींद्र कुटे, प्रा. डॉ. सुनील खिलारी, गुलाबराव पादीर, योगगुरू अनिल कुलकर्णी, रणजित श्रीगोड, प्रा. रामचंद्र राऊत, आरोग्यमित्र सुभाषराव गायकवाड, हभप प्रा. सखाराम कर्डिले, सौ. पुष्पाताई बारहाते, सुरेखा बुरकुले, मेघना भांबारे, आशाकाकू कल्याणकर, दत्तात्रय चव्हाण, कुंडलिक कापाळे, राजेश भांबारे, डॉ. संजय दुशिंग, भगवान सरोदे, प्रा. प्रकाश डेंगळे, आबा साळुंखे, वसंतराव पवार, केशव वाणी, अरुण धर्माधिकारी, कोल्हेगुरूजी, सुभाष लिंगायत, बाबासाहेब चेडे, आदी उपस्थित होते. संजय बुरकुले,सुयोग बुरकुले, संकेत बुरकुले यांनी नियोजन केले. डॉ. शिवाजी काळे, प्रसन्न धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले तर सुदामराव औताडे पाटील यांनी आभार मानले.



