इतर
पारनेर बस स्टॉप व काॅलेज परिसरातील रोड रोमियांचा बंदोबस्त करा- अविनाश पवार

पारनेर /प्रतिनिधी
पारनेर शहरामध्ये शाळा आणि काॅलेज सुटल्यावर पारनेर बस स्टॉप तसेच काॅलेज परिसरात मुलींची छेडछाड काढणा-या घटना घडत आहे
याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे तक्रार प्राप्त झाल्यामुळे पारनेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.घनश्याम बळप यांची भेट घेतली
बस स्टॉप तसेच काॅलेज परिसरात संबंधित घटनांची माहिती देऊन टगेखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी चे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने माथाडी कामगार सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पवार यांनी केली पोलिसांना दिले
.यावेळी सहकार सेना जिल्हाध्यक्ष नितीन म्हस्के सह महाराष्ट्र नवनिर्माण निर्माण सेनेचे सैनिक उपस्थित होते.