मजदूर संघाच्या चेतना यात्रा रथाचे रत्नागिरीत स्वागत!

रत्नागिरी दि 13
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
काल सकाळी 11 वाजता मजदूर संघाचा रथ रत्नागिरीच्या लांजा येथे पोहचला लांजा गावात महाराष्ट्र् वीज कंत्राटी कामगार संघाचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रशांत साळवी व महापारेषन कंपनी उपमहामंत्री श्री प्रशांत बाकळकर यांनी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते एकत्र करून मजदूर संघाच्या चेतना यात्रेच्या रथाचे स्वागत केले
लांजा गावात भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री अनिल ढुमने यांनी कामगारांना चेतना यात्रेचे महत्व व मोलाचे मार्गदर्शन केले लांजा गावातून चेतना यात्रेचा रथ हाथ खांबा या गावात पोहचला तेथे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे केंद्रीय उपाध्यक्ष श्री जयंद्र थूळ व रत्नागिरी जिल्हा सचिव श्री अजित शिंदे रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्ते घेऊन चेतना यात्रेच्या रथाचे स्वागत केले तेथे संघटनेचे महामंत्री श्री सचिन मेंगाळे व कोषाध्यक्ष श्री सागर पवार यांनी चेतना रथाचे महत्व सांगून मार्गदर्शन केले

चेतना यात्रेच्या रथाबरोबर कार व बाईक रॅली काढून रत्नागिरी शहरात प्रवेश केला व पूर्ण रत्नागिरी शहरात ही रॅली फिरवण्यात आली भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले तेथून पुढे चेतना रथातील पदाधिकारी यांनी असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जन्मस्थळी भेट देऊन अभिवादन केले त्यानंतर रत्नागिरी शहरातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पन करून अभिवादन करून रत्नागिरी शहरात भव्य सभा घेण्यात आली
या सभेत भारतीय मजदूर संघाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते हरीभाऊ चव्हाण,रत्नागिरी संघटनमंत्री,सौ संजना वाडकर,श्री उमेश महाडिक,श्री एस के सिंग,महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे उपमहामंत्री श्री राहुल बोडके,कार्याध्यक्ष श्री अमर लोहार,संघटनमंत्री श्री उमेश आनेराव व भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री अनिल ढुमने यांनी मार्गदर्शन केले