…..तर बाजीराव दराडे यांचे आर. पी. आय. मध्ये स्वागत करू – विजय पवार

अकोले प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्हा संपर्कप्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य श्री बाजीराव दराडे हे शिवसेनेमध्ये नाराज असल्याचे चर्चा सोशल मीडियातून येत आहे ते तिकडे नाराज असेल तर त्यांनी राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात यावे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात त्यांचे स्वागत करू त्यांनी आमच्या पक्षात प्रवेश केलाच तर त्यांचे सन्मानाने स्वागत करू असे अकोले तालुका आर पी आय चे युवक तालुका अध्यक्ष विजय पवार यांनी म्हटले आहे
शिवसेना शिंदे गटाचे अहिल्यानगर जिल्हा संपर्कप्रमुख व अहमदनगर अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे हे शिवसेना शिंदे गटामध्ये नाराज असल्याची चर्चा समाज माध्यमांमध्ये सुरू आहे त्यांनी आरपीआय पक्षात प्रवेश केल्यास त्याचे आम्ही स्वागत करू असे सांगत श्री पवार यांनी म्हटले आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना आरपीआय मध्ये प्रवेश देऊ आरपीआयचे महाराष्ट्र राज्य सेनेचे विजयराव वाकचौरे महाराष्ट्र राज्य संघटक रमेश शिरकांडे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात यांचे शी चर्चा करून बाजीराव दराडे यांना पक्षात योग्य पदावर संधी देऊ व त्यांचा योग्य ते सन्मान राखू असे श्री विजय पवार यांनी म्हटले आहे



