इतर

अकोले -परेल एस टी बस सेवा पुन्हा सुरु, ठिक ठिकांणी बस चे स्वागत

अकोले प्रतिनिधी

– गेल्या वर्षभरापासून बंद असणारी अकोले- परेल ही एसटी बस सेवा अखेर पुन्हा सुरू करण्यात आली आहे सुमारे वर्षभराच्या कालखंडानंतर पुन्हा बस सेवा सुरू झाल्यानंतर अकोले परेल या बसचे प्रवास मार्गात ठीक ठिकाणी स्वागत करण्यात आले


कोतुळ येथे या बसचे जोरदार स्वागत करण्यात आले चालक मच्छिंद्र वाघ व वाहक डी डी कर्णिक यांचा शाल श्रीफळ देऊन राजेंद्र पाटील देशमुख यांनी सत्कार केला अकोले तालुक्यातील विशेषतः मुळा परीसरांतील प्रवाशांना माळशेज मार्गे कल्याण,मुंबई ला जाण्यासाठी अंत्यन्त उपयोगी बस असल्याचे राजेंद्र देशमुख यांनी सांगितले
यावेळी उपसरपंच माजी उपसरपंच राजेंद्र पाटील देशमुख ग्रामपंचायत सदस्य सागर घोलप सोमनाथ लेंभे, दौलत देशमुख, रामचंद्र भोजने, सुनील गीते, दत्तात्रय जाधव श्री खरात, बाळासाहेब भुजबळ आदी ग्रामस्थ व प्रवासी उपस्थिती होते ब्राम्हणवाडा बेलापूर बोटा याठिकाणीही बस चेस्वागत करण्यात आले a

श्री रामनाथ भोजने, श्री हाडवळे मेजर, यांनी बस चे चालक मच्छिंद्र वाघ व वाहक डी डी कर्णिक यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन कल्याण येथे स्वागत केले

अकोले तालुक्यातील प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन अकोले आगाराने अकोले- परेल ही प्रवासी एसटी बस सेवा पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला

सुमारे एक वर्षापासून ही बस सेवा बंद होती प्रवाशांच्या मागणीनुसार व प्रवासी संघटनांच्या पाठपुराव्याने दिनांक ०१/०८/२०२५ पासून ही बस सेवा सकाळी ९.०० वाजता अकोले येथून परेल मुक्काम करीता बस सेवा सुरू करण्यात आली

ही बस अकोले- कोतूळ-ब्राह्मणवाडा-बेलापूर-बोटा-आळेफाटा-ओतूर माळशेज मार्गे टोकवडे-मुरबाड-कल्याण ठाणे-घाटकोपर-सायन-दादर-मार्गे परेल ला पोहचेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ५.४५ मिनिटांनी परेल येथून पुन्हा परेल,- दादर -सायंन- घाटकोपर- ठाणे-कल्याण- मुरबाड माळशेज मार्गे ओतृर- आळेफाटा- बोटा -बेलापूर -ब्राम्हणवाडा- कोतुळ मार्गे अकोले ला पोहचेल

तांत्रिक अडचणी मुळे सध्या परेल ऐवजी हि बस कुर्ला नेहरू नगर येथे पर्यंत जाऊन परतिचा प्रवास करेल या बस सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आव्हान अकोले आगार व्यवस्थापक सुरेश दराडे कंट्रोल ऑफिसर सागर सांगळे सह्याद्री आदिवासी प्रवासी संघटना मुंबई चे अध्यक्ष रामनाथ भोजने सचिव भाऊसाहेब जगधने यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button