रामनाथ भोजने यांना जननायक बिरसा मुंडा पुरस्कार प्रदान

उल्हासनगर दि 13 साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठान यांच्या वतीने महाराष्ट्रातील कलावंत, साहित्यिक, लेखक , पत्रकार , कला, दिग्दर्शक, अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा २०२५ शहीद अरुण कुमार वैद्य सभागृह टाऊन हॉल मुंबई उल्हासनगर येथे पार पडला
.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार कुमार आयलाणी, रिपब्लिकन नेते अण्णासाहेब रोकडे
पाटील साहेब (शरद प्रतिष्ठान मुंबई ), राजाराम शेलार (अध्यक्ष शरद प्रतिष्ठान मुंबई ), प्रकाश उबाळे( संपादक मेघदूत), अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रकाश जाधव अनेक मान्यवर महाराष्ट्रातील उपस्थित होते.
कार्यकमाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, यांच्या प्रतिमेला पुष्प माला अर्पण करून झाली.या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कलावंतामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या कार्यकर्त्यांन मध्ये
आदिवासी समाजातील कार्यकर्ते व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे मुंबई विभाग अध्यक्ष श्री.रामनाथ भोजने यांना जननायक बिरसा मुंडा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सामाजिक क्षेत्रातील धर्मा पाटील , धार्मिक क्षेत्रातील राजाराम शेलार , प्रथमेश(दगडू) परब (अभिनेता), हर्षवर्धन वावरे (सिने पार्श्व गायक), उर्मिला धनगर( सिने पार्श्व गायक), केतकी माटेगावकर(अभिनेत्री), यांना गौरविण्यात आले अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी या कार्यकमाचे आभार मानून राज बेळदकर, प्रफुल केदार, बाळासाहेब सांगळे , अविनाश शिंदे , राजेश धनराव, विद्याताई बेलदकर यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले….



