प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय येथे रक्षाबंधन संपन्न.

मनात व्यर्थ आणि नकारात्मक विचारांची गती अधिक असते….. ब्रह्माकुमारी मंजू दिदी.
. पारनेर प्रतिनिधी.
मनात व्यर्थ आणि नकारात्मक विचारांची गती अधिक प्रमाणात असते. आणि हि गती जंगला प्रमाणे असते ती सतत वाढतच जाते तर सकारात्मक विचारांची गती हळूच संख्याने कमी तर काही वेळा पुरतीच असते. हि सकारात्मक विचाराची गती अंगणातील बागे सारखी असते तिला विकसित करावे लागते. ज्या प्रमाणे मनात विचार असतात त्या प्रमाणे ते आपल्या चेहऱ्यावर दिसून येतात. त्या प्रमाणे आपल्या कपाळावर चिंता दिसते. एक विचार अनेक विचारना जन्म देत असतात. ज्या प्रमाणे शरीराचे आजाराचे निदान करायचे असेल तर नाडीची गती तपासली जाते त्या प्रमाणे मनाचा आजार हा विचारांच्या गतीने माहित पडतो ज्या प्रमाणे शरीराचे आजार बरे करायचे असेल तर सलाईन, औषध देऊन बरे केले जातात त्या प्रमाणे मनाचे आजार हे सत्संगांचे सार, चांगले विचार, सतत मनन चिंतन केल्याने मनाचे आजार कमी होत असतात असे प्रतिपादन राजयोगिनी मंजू दिदी यांनी केले

त्या पारनेर येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय आयोजित रक्षाबंधन कार्यक्रम मध्ये बोलत होत्या. यावेळी अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजयोगिनी राजेश्वरी दिदी,प्रभा दिदी, ज्ञानेश्वरी दिदी, पारनेर केंद्राच्या ब्रह्माकुमारी साधना दिदी, लताबाई खोडदे, देवराम ढोले, ॲड. शिवाजी जाधव, जबाजी खोडदे, हिराबाई मगर, देवराम खोडदे आदी मान्यवर उपस्थित होते.
ब्रह्माकुमारी मंजू दिदी यांनी सांगितले की, तीन प्रकारे आपण ईश्वराला आठवण करत असतो. एक म्हणजे दुःखात, दुसरे आहे कुणी आठवण करते म्हणून आपण आठवण करतो आणि तिसरी आठवण हि विचारानी सतावणारी आठवण असते. कर्माची सूक्ष्म गती सांगितली की जर आपल्या मनात राग द्वेष असेल तर आपल्या ना ईश्वराची आठवण येईल ना मन स्वच्छ राहील जर मनात आपण अशुभ भाव ठेवत आहोत तर आपण नकळत सूक्ष्म पाप कर्माचे भागीदार बनत आहोत. तर रक्षाबंधन विषयी संदेश देताना राजेश्वरी दिदी यांनी सांगितले की, मानवाची दृष्टी, वृत्ती व कृती जर शुद्ध व श्रेष्ठ असेल तरच खऱ्या अर्थाने रक्षाबंधन साजरे होईल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी साधना दिदी यांनी केले तर आभार सर्व ईश्वरीय परिवाराने आभार मानले.



