इतर

श्री संदीप वाकचौरे यांचे शिक्षण रंग व भाषा शिक्षण या पुस्तकाकांचे 17 ऑगस्ट ला पुण्यात प्रकाशन

संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर येथील पत्रकार व लेखक श्री संदीप वाकचौरे यांचे चपराक प्रकाशानाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या शिक्षण रंग व भाषा शिक्षण या दोन पुस्तकाचे 17 ऑगस्ट रोजी पुण्यात प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन जेष्ठ अभिनेते निर्माते व दिग्दर्शक अरुण नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली. तसेच अभिनेते चित्र नाट्य निर्माते अभिराम भडकमकर यांच्या शुभहस्ते आणि कुतवळ फुड्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक राम कुतवळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती चपराक प्रकाशनाचे प्रकाशक घनश्याम पाटील यांनी दिली.

संदीप वाकचौरे यांच्या ‘एक लेखक, एक प्रकाशन व एक विषय’ या प्रादेशिक भाषेतील पहिल्याच प्रयोग मालेतील हे चौदावे पुस्तक आहे. यापूर्वी चपराक प्रकाशानाच्या वतीने ऐसपैस शिक्षण, परिवर्तनाची वाट, शिक्षणाचीया द्वारी, शिक्षणनामा, शिक्षणाचे पसायदान, परिवर्तन शिक्षण ,सृर्जनाची वाट ,विनोबांची शिक्षण छाया,शोध शिक्षणाचा, पाटी पेन्सिल, शिक्षणाचे दिवा स्वप्न, शिक्षणाचे प्रश्नोपनिषद अशी एकूण 14 पुस्तके चपराक प्रकाशित करण्यात आली आहेत. अवघ्या दोन वर्षांमध्ये ही 14 पुस्तके प्रकाशित झाले यातील अनेक पुस्तकांच्या आवृत्ती पहिल्या दोन-तीन महिन्यातच संपलेल्या आहेत. वाचकांनी अधिक चांगला प्रतिसाद दिला आहे असे पाटील यांनी सांगितले.संदीप वाकचौरे यांची शिक्षण विषयक विविध सदरांचे लेखन प्रसार माध्यमामधून सातत्याने केले आहे. विविध वृत्तपत्रासाठी ते स्तंभलेखन करत असून राज्य शासनाच्या विविध शिक्षण समितीच्या सदस्य आहेत. राज्य अभ्यासक्रम पुनर्रचना समिती व बालभारती कार्यगट सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. शासनाच्या विविध प्रशिक्षणात साहित्य निर्मिती विकसन व राज्यस्तरावर मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत आहेत.

पुणे येथे पत्रकार भवन, अलका टॉकीज जवळ सकाळी दहा वाजता वरील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. जास्तीत जास्त वाचकाने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button