पारनेर तालुका मेडिकल संघटनेच्या वतीने वडनेर येथील राणूबाई डोंगरावर ट्रेकेथॉनचे आयोजन

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी :-
मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (PTMPA) तर्फे वडनेर येथे राणूबाई डोंगरावर भव्य ट्रेकथॉन चे आयोजन करण्यात आले होते.“Health is Wealth – आरोग्य हीच खरी संपत्ती” हा संदेश देत १०५ डॉक्टरांनी या उपक्रमात उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला.नेहमीच रुग्णाची सेवा करत असताना आपल्या आरोग्याकडे देखील दुर्लक्ष होऊ नये म्हणून संघटना नेहमीच असे उपक्रम राबवत असते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. प्रदीप इंगळे (स्त्रीरोगतज्ज्ञ, स्नेहदीप हॉस्पिटल, अहिल्यानगर) होते. त्यांच्या उपस्थितीत निसर्गसंवर्धनाचा संकल्प घेऊन वृक्षारोपण करण्यात आले.
डोंगरमाथ्यावरील हिरवाई, निसर्गातील शुद्ध हवा आणि एकतेचा भाव यामुळे सर्व सहभागी डॉक्टरांना ताजेतवाने वाटले. डॉक्टरांमध्ये आरोग्याबरोबरच निसर्गप्रेम आणि सामाजिक जाणीव दृढ करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या उपक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी PTMPA चे अध्यक्ष डॉ.संदीप औटी,उपाध्यक्ष डॉ.राजेंद्र वाकळे,सचिव डॉ.पांडुरंग थोरात,सहसचिव डॉ.सुशील पादिर,खजिनदार डॉ.अरविंद नांगरे यांनी व इतर कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले.
“वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे” या संत तुकाराम महाराजांच्या अभंगानुसार वृक्षांपासून मनुष्याला अनेक फायदे आहेत म्हणून तेच आपले सगे सोयरे आहेत.झाडे लावा देश वाचवा.पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी पारनेर तालुका मेडिकल असोसिएशनच्या वतीने आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता.
डॉ. संदीप औटी,
अध्यक्ष, पारनेर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन.
पारनेर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनने अतिशय सुंदर असा ट्रेकेथॉन व वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.नक्कीच ही संस्था इतर डॉक्टर असोसिएशनला मार्गदर्शक आहे. नेहमीच चांगले चांगले उपक्रम राबवत असते.
डॉ. प्रदीप इंगळे , स्त्रीरोग तज्ञ ,स्नेहदीप हॉस्पिटल ,अहिल्यानगर.



