सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांचा अमृतसागर दूध संघाकडून सन्मान!

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील अमृतसागर दूध संघा कडून सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांचा नुकताच गौरव करण्यात आला
अमृतसागर दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सेवेत या दूध उत्पादक शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले संघाचे चेअरमन वैभवराव पिचड व्हाईस चेअरमन रावसाहेब वाकचौरे जनरल मॅनेजर दादाभाऊ सावंत तसेच सर्व संचालक यांच्या उपस्थितीत आज गौरव पात्र दूध उत्पादकांना सन्मानित करण्यात आले
अमृतसागर सहकारी दुध व्यावसायिक व प्रक्रिया संघ मर्या, अकोले या अकोले तालुक्यातील शिखर संस्थेला सन २०२४-२०२५ या सालामध्ये दुध उत्पादक श्री.नामदेव मुरलीधर साबळे, कोतुळ यांनी संस्थेस ३ लाख,३३,हजार २०९ लिटर इतके सर्वाधिक दुधाचा पुरवठा करुन प्रथम क्रमांक मिळविला या केल्याबद्दल त्यांचा दूध संघाने सन्मानपत्र प्रदान केले
अमृत सागर दूध संघाने गौरविण्यात आलेले दूध उत्पादक पुढीलप्रमाणे
प्रथम क्रमांक -श्री. नामदेव मुरलीधर साबळे कोतूळ
(३,३३,२०९ लिटर)
द्वितीय क्रमांक– अपना डेअरी फार्म,कुंभेफळ( १,४९,०६७ लिटर)
तृतीय क्रमांक– सौ. शितल मिलिंद नाईकवाडी
आंबड (१,४४,५७२ लिटर)
उत्तेजनार्थ – प्रविण तात्याबा धुमाळ धुमाळवाडी (१,२१,४१६ लिटर)
उत्तेजनार्थ-. संतोष सुदाम काकड,पिंपळदरी (१,०३,६०५ लिटर)
संघास सन २०२४-२०२५ मध्ये जास्तीत जास्त दुधाचा पुरवठा करणारे गौरवप्राप्त आदिवासी दूध उत्पादक शेतकरी
प्रथम क्रमांक-श्री. पाराजी शंकर वायळ वाघापुर
(७९,४२७ लिटर)
द्वितीयक्रमांक– श्री. सुनिल सोमनाथ मुंढे,शेलद मुंढेवाडी (२८,७९७ लिटर)
तृतीयक्रमांक–
.श्री. तुकाराम अशोक गोंदके करंडी (१९,६७४ लिटर)
उत्तेजनार्थ -श्री. योगेश किसन मुंढे शेलद मुंढेवाडी
(१८,९७१ लिटर)
उत्तेजनार्थ – श्री. संजय मनोहर घिगे
शेलद मुंढेवाडी (१५,०१३ लिटर)



