इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.०३/०९/२०२५,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद १२ शके १९४७
दिनांक :- ०३/०९/२०२५,
वार :- सौम्यवासरे(बुधवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१६,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:४१,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- भाद्रपद
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- एकादशी समाप्ति २८:२२,
नक्षत्र :- पूर्वाषाढा समाप्ति २३:०९,
योग :- आयुष्मान समाप्ति १६:१७,
करण :- वणिज समाप्ति १५:१३,
चंद्र राशि :- धनु,
रविराशि – नक्षत्र :- सिंह – पूर्वा,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- कर्क,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- दु. ०४प. चांगला दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी १२:५५ ते ०२:०१ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०६:१६ ते ०७:४९ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०७:४९ ते ०९:२२ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी १०:५५ ते १२:२८ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०५:०८ ते ०६:४१ पर्यंत,

❀ दिन विशेष:
परिवर्तन एकादशी, घबाड २८:२२ नं., भद्रा १६:१३ नं. २८:२२ प.,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद १३ शके १९४७
दिनांक = ०३/०९/२०२५
वार = सौम्यवासरे(बुधवार)

मेष
जुन्या कामांमधून यश मिळेल. घरात धार्मिक कार्य घडेल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. दिवसाच्या पूर्वार्धात रखडलेली कामे मार्गी लागतील. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील.

वृषभ
सामाजिक मुद्यात लक्ष घालू नका. अपेक्षित उत्तर मिळेल. नवीन ओळखीतून लाभ होईल. अप्रिय व्यक्तीची भेट घडू शकते. शासनाकडून लाभाची शक्यता.

मिथुन
घरासाठी नवीन खरेदी केली जाईल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. मन काहीसे विचलीत राहील. मुलांची प्रगती पाहून मन खुश होईल.

कर्क
मानसिक चंचलता राहील. अति विचार करू नका. महत्त्वाची कामे आज टाळावीत. कौटुंबिक जबाबदारी सांभाळावी लागेल. जवळचे मित्र भेटतील.

सिंह
प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. अति कामामुळे थकवा जाणवेल. बोलण्यातील माधुर्यामुळे मान मिळवाल. व्यापारीवर्ग खुश राहील. कामाची धावपळ वाढेल.

कन्या
रखडलेली कामे पूर्ण करा. तुमच्या पराक्रमात वाढ होईल. मन प्रसन्न राहील. चांगल्या गोष्टीसाठी पैसे खर्च होतील. व्यापारी क्षेत्रातील प्रयत्न फळाला येतील.

तूळ
योग्य शहानिशा करावी. कौटुंबिक वातावरण समाधानकारक राहील. आनंदाची अनुभूति घ्याल. धनलाभाचे उत्तम योग आहेत. प्रेमातील व्यक्तींना उत्तम दिवस.

वृश्चिक
नवीन खरेदी कराल. विद्यार्थ्यांनी अति घाई करू नये. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. गुंतवणुकी संदर्भात नवीन गोष्टी जाणून घ्याल. अति विचारात वेळ वाया घालवू नका.

धनू
मानसिक शांतता लाभेल. कामात तुमचा उत्तम प्रभाव पडेल. सासरच्या मंडळीकडून धनलाभाचे योग आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. जुने काम मार्गी लावण्याची संधी मिळेल.

मकर
धार्मिक कामाची आवड वाढेल. जोडीदाराच्या कलाने काम करा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मिळकतीच्या बाबतीतील प्रयत्न यशस्वी होताना दिसतील. भावनात्मकता टाळावी.

कुंभ
जोडीदाराचे म्हणणे टाळू नका. खेळ व कलेमध्ये रमाल. अति भावुक होऊ नका. पराक्रमाला चांगला वाव आहे. नियोजना अभावी कामे रेंगाळू शकतात.

मीन
आरोग्यात सुधारणा होईल. कामात अधिक स्फूर्ति येईल. मुलांसोबत दिवस खेळीमेळीत जाईल. उधारीचे व्यवहार करू नका. बोलण्याच्या भरात शब्द देऊ नका.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button